Home /News /national /

हैदराबाद पुन्हा हादरले, अल्पवयीन मुलीवर 30 वर्षीय शेजाऱ्याने केला बलात्कार

हैदराबाद पुन्हा हादरले, अल्पवयीन मुलीवर 30 वर्षीय शेजाऱ्याने केला बलात्कार

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका महिला डाॅक्टरवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं होतं

    तेलंगणा, 29 जानेवारी : काही दिवसांपूर्वीच महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातून हैदराबाद सावरतच होते. त्यातच एक मन हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. तेलंगाणातील पंजागट्ट येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणारे सरकार त्यांची सुरक्षितता देण्यात अपयशी ठरत आहे. बलात्कारप्रकरणांमध्ये अधिकतर दोषी हे मुलीच्या कुटुंबातील वा शेजारील असतात असं निरीक्षण आहे. या धर्तीवर बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी काहीतरी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका महिला डाॅक्टरवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. य़ा नराधमांनी तिचा बलात्कार करुन तिला जाळून टाकलं. पोलिसांना सायबरबाद टोल प्लाझाजवळ महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्कारानंतर महिलेची हत्या करण्यात आली, त्यानंतर मृतदेह पेट्रोलने पेटवून उड्डाणपुलाखाली फेकण्यात आला. मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकांत केशवुलू आणि शिवा अशी 4 आरोपींची नावं होती. या महिला डॉक्टरवरील बलात्कारानंतर चार आरोपींच्या पोलीस चकमकीत ठार करण्यात आले होते. या चमकमीवर अनेक सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. अनेकांनी पोलिसांनी चकमकीत त्यांना ठार केल्याबद्दल त्यांचे कौतुक केलं होतं. तर दुसरीकडे पोलिसांनी न्याय व्यवस्था हातात का घेतली म्हणून प्रश्न उपस्थित केले जात होते. नंतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांच्या न्यायालयीन चौकशी आयोगाची स्थापना केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रेखा बालदोता आणि सीबीआयचे माजी संचालक कार्तिकेन भी यांनाही या आयोगाचे सदस्य केले गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Girl rape, Hydrabad

    पुढील बातम्या