चहा प्यायल्यानंतर कप फेकायचा नाही तर चवीनं खायचा, पाहा VIDEO

डिस्पोजेबल वस्तूंचा वापर कमी करणं आणि प्लास्टिक, पेपर कप याला पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हेतूनं कंपनीने खाता येणाऱ्या कपाची निर्मिती केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 09:44 PM IST

चहा प्यायल्यानंतर कप फेकायचा नाही तर चवीनं खायचा, पाहा VIDEO

हैदराबाद, 18 ऑक्टोबर : चहा पिण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक किंवा पेपर कपचा वापर करण्यात येतो. पण यामुळे प्लास्टिकचा कचरा वाढतो. यावर उपाय म्हणून हैदराबादमधील एका कंपनीने एक शोध लावला आहे. यामुळे आता चहा प्यायल्यानंतर तो कप फेकायचा नाही. तर तो कप खाता येणार आहे. या कपमध्ये 40 मिनिटापर्यंत थंड आणि गरम पेय ठेवता येतं. कप फेकून दिला तरी तो नष्ट होईल त्यामुळे पर्यावरणाचं नुकसानही होणार नाही.

खाता येणाऱ्या कपची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे एक्झिक्यूटीव्ह डायरेक्टर अशोक कुमार यांनी सांगितले की, याला इट कप असं नाव देण्यात आलं आहे. लोकांकडून डिस्पोजेबल वस्तूंचा वापर कमी करणं आणि प्लास्टिक, पेपर कप याला पर्याय उपलब्ध करून देणं हा हेतू आहे. ईट कपच्या वापराने पर्यावरणाची हानी कमी होईल. तसेच मानवी शरीराचं नुकसान होणार नाही.

कंपनीने म्हटलं आहे की, ईट कप सर्व प्रकारच्या थंड आणि गरम पेय ठेवण्यासाठी योग्य आहे.यामध्ये सूप, दारू, चहा, कॉफी यासह इतर पेय पिता येतात. 40 मिनिटांपर्यंत या कपमध्ये पेय ठेवता येतं. धान्यांपासून ईट कप तयार केले असून यात वापर आलेल्या पदार्थांमुळं हा कप खाण्यायोग्य असून चवदारही असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. तसेच या कपामुळे त्यातील पेयाची चवही बदलत नाही असंही कंपनीच्या संचालकांनी सांगितलं आहे.

VIDEO: पवारांच्या वयावरून मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका, दिलं 'शोले'चं उदाहरण

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 09:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...