'मौत का कुआँ', एकाच विहिरीतून बाहेर काढले 9 मृतदेह; हत्या की आत्महत्या?

'मौत का कुआँ', एकाच विहिरीतून बाहेर काढले 9 मृतदेह; हत्या की आत्महत्या?

लॉकडाऊनच्या काळात एका विहिरीत कामगाराच्या कुटुंबासह 9 जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 22 मे : एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या पटकथेसारखाच धक्कादायक असा प्रकार तेलंगणात उघडकीस आला आहे. तेलंगणामध्ये वारंगलजवळच्या परिसरात एक विहीर रहस्याचा केंद्रबिंदू ठरली आहे. या विहिरीतून दोन दिवसात तब्बल 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले. गोरेकुंटा भागात एका गोदामाजवळ असलेल्या विहिरीतून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही सामूहिक आत्महत्या आहे की हत्या असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मृतदेहांपैकी 6 जण एकाच कुटुंबातील सदस्य होते. हे सर्वजण पश्चिम बंगालमधील कामगार असल्याचं सांगितलं जात आहे. 50 वर्षीय कामगार मकसूद , त्यांची पत्नी, मुलगी आणि या मुलीचा 3 वर्षांच्या मुलाचाही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. स्रव मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

वारंगल इथे या विहिरीजवळ असलेल्या गोदामाच्या मालकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. 20 वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पश्चिम बंगालमधून मकसूद वारंगलमध्ये आला होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झालं. या काळात मकसूद कुटुंबियांसोबत गोदामात राहात होता. गोडाऊन मालकाला जेव्हा कुटुंबिय दिसले नाही तेव्हा शंका आली. त्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विहिरीमध्ये त्यांचे मृतदेह आढळल्याची माहिती त्यांनी स्थानिक पोलिसांना दिली.

पाहा VIDEO : लॉकडाऊनमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, पाहा कोरोनाच्या संकटात कसे खेळले

दरम्यान, मृतदेहांवर कोणत्याही जखमा नाहीत. अशा परिस्थितीत मृत्यू कसा झाला? ही हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक कामधंदे बंद आहेत. मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जगणं मुश्कील झाल्यानं मजुरांनी टोकचं पाऊल उचललं नाही ना? अशीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर विहिरीतून आणखीन काही मृतदेह बाहेर निघण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तापासाची पुढची दिशा निश्चित होईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचा : झुंज अपयशी! पुण्यात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टरचा बळी

First published: May 22, 2020, 10:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading