जीवघेणा उन्हाळा ! उष्माघातामुळे रशियन पर्यटकाचा मृत्यू

जीवघेणा उन्हाळा ! उष्माघातामुळे रशियन पर्यटकाचा मृत्यू

हैदराबामध्ये एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झाल्याची उष्माघातानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

  • Share this:

हैदराबाद, 16 मे : देशभरात उन्हाचा कडाका वाढतच आहे. वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्यानं नागरिकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. हैदराबामध्ये तर एका रशियन पर्यटकाचा मृत्यू झाल्याची उष्माघातानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षांचा हा रशियन नागरिक टुरिस्ट व्हिसावर 14 मे रोजी हैदराबादमध्ये आला होता.

वाचा : 'या' जिल्ह्यात उष्माघाताने 15 जणांचा मृत्यू, उन्हाची तीव्रता आणखी वाढणार

अलेक्झँडर असे मृत्यमुखी पडलेल्या रशियन नागरिकाचं नाव आहे. बुधवारची (15 मे) ही घटना आहे. या प्रकरणी  स्थानिक पोलिसांनी संशयास्पद मृत्यू नोंद केली आहे. उष्माघातामुळे या रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इमारतीजवळ अलेक्झँडर बेशुद्ध अवस्थेत आढळला.

वाचा : बीड : लग्नाच्या वाढदिवशीच उष्माघातामुळे सराफा व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

यानंतर स्थानिकांनी तातडीनं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

VIDEO: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला मारहाण करत हिसकावली सोनसाखळी

First published: May 16, 2019, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading