काँग्रेसला मोठा धक्का; 12 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत!

काँग्रेसला मोठा धक्का; 12 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत!

काँग्रेसमधील 18 पैकी 12 आमदारांनी पक्ष सोडून सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करण्याची तयारी केली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 06 जून: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये देशपातळीवर गोंधळ सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर अनेक नेत्यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी देखील राजीनामे दिले आहे. यातच पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाने डोक वर काढले आहे. या गोंधळाच्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. तेलंगणामधील काँग्रेसमधील 18 पैकी 12 आमदारांनी पक्ष सोडून सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षात प्रवेश करण्याची तयारी केली आहे.

काँग्रेसच्या या 12 आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पक्ष बदलणार असल्याचे पत्र दिले आहे. दोन तृतियांश आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय दिल्यामुळे त्यांचे पद धोक्यात येणार नाही. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत TRSने 119 पैकी 88 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने 18 जागा मिळवल्या होत्या. निवडणुकीनंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता होती. आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या 12 आमदारांनी पक्ष बदलण्याची भूमिका घेतली आहे. हे सर्व आमदार नाराज असल्याचे समजते आणि ते TRS सोबत जाणार आहेत.विधानसभेचे अध्यक्ष गायब

पक्षातील 12 आमदार बाहेर पडणार असल्याच्या वृत्तानंतर काँग्रेसचे राज्यातील प्रमुख एन.उत्तम कुमार रेड्डी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आम्ही लोकशाही पद्धतीने लढा देऊ. आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते गायब आहेत. काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी TRSमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे यात TRSमधून काँग्रेसमध्ये सहभागी आलेल्या रोहित रेड्डी यांचा समावेश आहे. रेड्डी यांना TRSमधून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण आता ते पुन्हा TRSमध्ये सहभागी होणार असल्याचे कळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेड्डी आमदारकीचा राजीनामा देऊन TRSमध्ये सहभागी होणार आहेत.

भडकलेल्या वळूचं भांडण सोडवण्यासाठी केला 'हा' अजब उपायबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 05:20 PM IST

ताज्या बातम्या