मराठी बातम्या /बातम्या /देश /

मेव्हण्याने पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाठवला भावजीला, त्याने घरी येऊन केला रेप!

मेव्हण्याने पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाठवला भावजीला, त्याने घरी येऊन केला रेप!

 या प्रकरणानंतर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाला. त्यानंतर भावजीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

या प्रकरणानंतर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाला. त्यानंतर भावजीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

या प्रकरणानंतर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाला. त्यानंतर भावजीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

  • Published by:  sachin Salve
ग्वालियर, 21 ऑगस्ट : मेव्हणाने आपल्याच पत्नीचा आंघोळ करत असताना, कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ आपल्या भावजींना पाठवला होता. पण, भावजीची नियत फिरली आणि त्याने व्हिडीओ व्हायरल (video viral) करण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार (rape) केला. या प्रकरणानंतर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न झाला. त्यानंतर भावजीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. नात्याला काळिमा फासणारी ही घटना मध्य प्रदेशमधील (madhya pradesh) ग्वालियर (Gwalior) शहरात घडली आहे. पती आणि भावजीच्या जाचाला कंटाळून अखेर महिलेनं पोलिसांत धाव घेतली आणि दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी दोघांविरोधात एफआयआर दाखल केला आहे, असं वृत्त आजतकने दिलं आहे. तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणाला नवे वळण, जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल समोर ग्वालियर पोलिसांनी विकृती आरोपी पतीला अटक केली असून त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे. तर त्याचा भावजी हा रायपूरमधील माजी मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये पीएसओ होता. त्याने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाइट नोटमध्ये भावजीने आपल्या साल्याच्या पत्नी आणि सासरच्या मंडळीकडून ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. मृतकाची पत्नी दीड महिन्याआधी रायपूर येथून निघून गेली होती. छोट्याशा चुकीमुळे मिळणार नाही Driving License; टेस्टवेळी लक्षात ठेवा ही गोष्ट त्याने आपल्या सुसाइट नोटमध्ये साल्याच्या पत्नीने आणि सासरच्या लोकांनी 30 लाख रुपये मागितले असल्याचे नमूद केले आहे. पडाव ठाण्याचे प्रभारी विवेक अष्ठाणा यांनी सांगितले की, पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आहे. यात तिने स्पष्ट केलं आहे तिचा पती हा गुपचुप तिचे अश्लील व्हिडीओ तयार करून तो आपल्या भावजीला पाठवत होता. जेव्हा भावजी घरी आला तेव्हा त्यानी पतीसमोरच महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने त्याला विरोधात केला आणि पतीला सांगितले, तर त्यानेच भावजीशी संबंध ठेवण्यास दबाव टाकला. त्यानंतर आरोपीने तिला गेस्ट हाऊसवर नेऊन बलात्कार केला.
First published:

Tags: Rape

पुढील बातम्या