मराठी बातम्या /बातम्या /देश /

ऐकावं ते नवलच! नवरीचा मेक-अप बिघडला; ब्युटीशियनवर केली केस

ऐकावं ते नवलच! नवरीचा मेक-अप बिघडला; ब्युटीशियनवर केली केस

file photo

file photo

राधिका सेन यांच्या भाचीचं लग्न 3 डिसेंबरला होतं. त्यासाठी वधूला उत्तम मेक-अप करण्यासाठी राधिका यांनी जबलपूरमधल्या कोतवाली बाजारातल्या मोनिका मेक-अप स्टुडिओमध्ये संपर्क साधला.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Jabalpur, India

जबलपूर, 7 डिसेंबर : विवाहसोहळा म्हणजे वधू-वरांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो. त्यामुळे तो अविस्मरणीय व्हावा, यासाठी आपल्या ऐपतीनुसार शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असतात. लग्नाच्या दिवशी वर आणि वधू हे उत्सवमूर्ती असतात. त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा समजलं जातं. त्यामुळे अत्यंत सुंदर कपडे परिधान केले जातात. मुली-महिलांना नटण्या-मुरडण्याची आवड जात्याच असते.

त्यामुळे स्वतःच्या लग्नासारख्या प्रसंगात तर वधू उत्तम साजश्रृंगार करते. त्यासाठी चांगल्या ब्युटीशियनलाही पाचारण केलं जातं आणि मेक-अप करून घेतला जातो. एकंदरीतच हे सारे प्रयत्न तो दिवस कायम स्मरणात राहावा यासाठी असतात; मात्र मध्य प्रदेशात जबलपूरमध्ये घडलेल्या एका प्रसंगामुळे वधू-वरांना आणि साऱ्या कुटुंबीयांनाच विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. 'नयी दुनिया'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

राधिका सेन यांच्या भाचीचं लग्न 3 डिसेंबरला होतं. त्यासाठी वधूला उत्तम मेक-अप करण्यासाठी राधिका यांनी जबलपूरमधल्या कोतवाली बाजारातल्या मोनिका मेक-अप स्टुडिओमध्ये संपर्क साधला. मोनिका पाठक या त्या स्टुडिओच्या संचालिका आहेत. राधिका सेन यांनी आपल्या भाचीच्या विशेष मेक-अपचं काम त्यांना दिलं. मोनिका यांनी वधूच्या मेकअपसाठी साडेतीन हजार रुपये मानधन सांगितलं. तसंच, त्या स्वतःच मेक-अप करणार असल्याचंही सांगितलं.

हेही वाचा - Love Marriage नंतर शेजाऱ्याशी जुळलं सुत; आडकाठी येणाऱ्या पतीचा सुपारी देऊन केला गेम

3 डिसेंबरला म्हणजे लग्नाच्या दिवशी वधू मेकअप करण्यासाठी मोनिका पाठक यांच्या पार्लरला गेली असता तिथे मोनिका पाठक उपस्थितच नव्हत्या. त्यांच्याऐवजी पार्लरला असलेल्या कर्मचाऱ्यांनी वधूचा मेक-अप केला; पण तो मेक-अप चांगला झाला नाही. तो मेक-अप बिघडून गेला. लग्नाच्या दिवशी असं झाल्याने सारे नाराज होणं स्वाभाविक होतं. राधिका यांनी वधूचा मेक-अप पाहून मोनिका यांना कॉल केला. मोनिका यांनी दिलगिरी व्यक्त करणं तर सोडाच, पण राधिका यांच्याशी असभ्य भाषेत संभाषण केलं, शिवीगाळ केली, तसंच जातिवाचक अपशब्द सुनावले. याबद्दल सेन वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही कळलं. या प्रकाराचं त्यांनाही वाईट वाटलं.

सेन वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि राधिका सेन यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात गेले जाऊन मोनिका पाठक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस आता या प्रकरणी पुढील कार्यवाही करणार आहेत. या घटनेमुळे वधू-वरांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अनिल गुप्ता या घटनेचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Lifestyle