लॉकडाऊनमध्ये जोडप्यानं घरी सुरू केलं सेक्स रॅकेट, एका रुमचं मिळायचं इतकं भाडं

लॉकडाऊनमध्ये जोडप्यानं घरी सुरू केलं सेक्स रॅकेट, एका रुमचं मिळायचं इतकं भाडं

वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या प्रमुखाने पोलिसांना स्पष्टीकरण दिलं की, महिलेचा पती आजारी आहे. त्यामुळे काही पैशांसाठी महिला तिची खोली भाड्याने देत होती.

  • Share this:

पंजाब, 29 जून : कोरोनाच्या महामारीमुळे देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. असात वेश्या व्यवसायाच्या एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी 3 महिलांसह 10 जणांना या प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या प्रमुखाने पोलिसांना स्पष्टीकरण दिलं की, महिलेचा पती आजारी आहे. त्यामुळे काही पैशांसाठी महिला तिची खोली भाड्याने देत होती.

वेश्या व्यवसायाचं हे प्रकरण पंजाब पोलिसांनी उघड केलं आहे. बरनाला पोलिसांनी या प्रकरणात 3 महिला आणि 7 पुरुषांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे. लॉकडाऊनमध्ये पैसे कमवायचा हाच मार्ग होता असंही यामधील एका आरोपीने सांगितलं.

पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं झाळलं, तुकडे करून फेकलं नदीत

या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या वेश्य़ा व्यवसायाच्या प्रमुख महिलेने पोलिसांना सांगितलं की, ती आणि तिचा पती सारखे आजारी असायचे. त्यामुळे त्यांना काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे काही मुलं मुलींना घरी आणायची आणि त्याचे आम्हाला 500 रुपये मिळायचे.

या प्रकरणात, महल कलांच्या एएसपी प्रज्ञा जैन यांनी सांगितलं की, 'छीनीवाल खुर्द या गावात एक घर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती आमच्या हाती लागली होती. त्यानंतर त्यांनी घरात छापा टाकला. तर घराची मालकिन आणि इतर 2 महिला आणि 7 पुरुष घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहेत.' तर या संपूर्ण प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.

आधी कुपोषण आता अंधश्रद्धेचा कळस, पोटफुगीमुळे चिमुकल्यांना दिले लोखंडी सळीचे चटके

संपादन - रेणुका धायबर

First published: June 22, 2020, 2:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या