मराठी बातम्या /बातम्या /देश /

वधू-वराचा 30 वर्षांपूर्वी मृत्यू; मात्र काल रात्रीच बांधली लग्नगाठ, वाचा अनोखा प्रकार

वधू-वराचा 30 वर्षांपूर्वी मृत्यू; मात्र काल रात्रीच बांधली लग्नगाठ, वाचा अनोखा प्रकार

अरुण 28 जुलै रोजी एका लग्नाला उपस्थित होता. यातील वधू आणि वर दोघांचेही सुमारे 30 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आ

अरुण 28 जुलै रोजी एका लग्नाला उपस्थित होता. यातील वधू आणि वर दोघांचेही सुमारे 30 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आ

अरुण 28 जुलै रोजी एका लग्नाला उपस्थित होता. यातील वधू आणि वर दोघांचेही सुमारे 30 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आ

    मंगलुरू, 29 जुलै : ३० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या वधू-वरांनी त्यांच्या मृत्यूनंतर लग्न कसे केले, याचा विचार तुम्ही नक्कीच केला असेल आणि म्हणूनच तुम्ही ही बातमी वाचण्यासाठी या बातमीवर क्लिक केलंय. तर हो हे खरंय. हा कोणत्याही प्रकारचा विनोद नाही आहे. तर ही दक्षिण कन्नड परंपरेचा भाग आहे. एनी अरुण नावाच्या एका तरुणाने ट्विटरवर याबाबत माहिती शेअर केली, जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. दक्षिण कन्नड परंपरा नेटिझन्सनी पाहावी, असा त्याचा उद्देश्य आहे. अरुण 28 जुलै रोजी एका लग्नाला उपस्थित होता. यातील वधू आणि वर दोघांचेही सुमारे 30 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आणि तरीही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला हे वाचून आश्चर्य होत असेल. मात्र, हा प्रकार नेमका काय, यासाठी तुम्हाला ही बातमी वाचावी लागेल. अरुणने ट्विट केले की, “मी आज लग्नाला जात आहे. यातील वराचा मृत्यू झाला आहे. आणि वधूही मेली आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वीसारखे आणि त्यांचे लग्न आज आहे. ज्यांना दक्षिण कन्नडच्या परंपरेबाबत माहिती नाही, त्यांना हे आश्चर्य वाटेल. तो पुढे म्हणाला की, ही एक "गंभीर परंपरा" आहे. यात मृत वधू आणि वरचे कुटुंब सहभागी होतात आणि कोणत्याही मुलांना याठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी नाही. तसेच “जे लोक बाळंतपणाच्या वेळी मरण पावतात, त्यांचे लग्न सामान्यतः बाळाच्या जन्मादरम्यान मरण पावलेल्या दुसऱ्या मुलाशी केले जाते. हेही वाचा - काय सांगता! गाडीमध्ये इंधन कमी असेल तर भरावा लागणार दंड; काय आहे हा नियम? सर्व प्रथा कोणत्याही लग्नाप्रमाणेच होतात. लग्नासाठी दोन कुटुंबे एकमेकांच्या घरी जातील,” तो पुढे म्हणाला. जर तुम्ही आश्चर्यचकित असाल तर येथे कुणीच उदास नाही. लग्नाची मिरवणूक होईल आणि आणि शेवटी गाठी बांधल्या जातील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Karnataka, Marriage

    पुढील बातम्या