मराठी बातम्या /बातम्या /देश /Girlfriend सोबत हॉटेलमध्ये होता पती, नंतर पोहोचली पत्नी अन् पुढे झालं असं की...

Girlfriend सोबत हॉटेलमध्ये होता पती, नंतर पोहोचली पत्नी अन् पुढे झालं असं की...

(PhotoCredit-Aajtak)

(PhotoCredit-Aajtak)

एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडसोबत (Girlfriend) हॉटेलमध्ये पोहोचला. याचीच भनक त्या व्यक्तीच्या पत्नीला आली. त्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी मागून हॉटेलमध्ये पोहोचली.

बिहार, 14 जानेवारी: बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूरमधून (Muzaffarpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडसोबत (Girlfriend) हॉटेलमध्ये पोहोचला. याचीच भनक त्या व्यक्तीच्या पत्नीला आली. त्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी मागून हॉटेलमध्ये पोहोचली आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. आजूबाजूचा लोकांची गर्दी जमली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतलं. हॉटेलमधला गोंधळ वाढलेला बघून प्रकरण त्या व्यक्तीने बाईक तशीच सोडली आणि ऑटो रिक्षामध्ये बसून तेथून फरार झाला.

गर्लफ्रेंडसोबत पती पोहोचला हॉटेलमध्ये, पत्नी आली मागून

पोलिसांनी समजल्यानंतर महिलेला घरी पाठवले असून लेखी तक्रार मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. ही महिला मिठणपुरा भागातील रहिवासी आहे. लग्नानंतरही तिच्या पतीचे अनेक मुलींशी संबंध आहेत. त्यामुळे महिलेला पतीवर संशय आला. पतीच्या हालचालींवर ती लक्ष ठेवून होती, अशी माहिती मिळतेय.

गोंधळ पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांनी बोलावलं पोलिसांना

पीडितेचे म्हणणे आहे की, तिचा पती देशी दारूचे काम करतो आणि गांजा विकतो. त्याचे अनेक मुलींशी अवैध संबंध आहेत. त्यामुळे दोघांचे भांडण होते. महिलेने सांगितले की, तिच्या पतीने तिला फोन केला आणि सांगितले की मला एक चांगली मुलगी सापडली आहे. या हॉटेलमध्ये येऊन बघ आणि त्यानंतर ती तिच्या लहान मुलाला घेऊन तिथे पोहोचली.

पोलिसांनी महिलेला सांगितलं लेखी तक्रार देण्यास

त्याचवेळी या प्रकरणावर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पती-पत्नीमध्ये वाद आहे. महिलेला लेखी तक्रार देण्यास सांगण्यात आले. मात्र आजपर्यंत तिनं लेखी अर्ज दिलेला नाही. गरज पडल्यास तक्रार करू, असे सांगून महिलेने तेथून निघून गेले. लेखी तक्रार आल्यावर कारवाई केली जाईल.

First published:

Tags: Bihar