बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; शिक्षेऐवजी मिळाली माफी

बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; शिक्षेऐवजी मिळाली माफी

नवऱ्यानं बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पण, शिक्षेऐवजी त्याला माफी मिळाली.

  • Share this:

अहमदाबाद, 16 मे : नवऱ्यानं बायकोला जिंवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात नवऱ्याला शिक्षा होणं अपेक्षित होतं. पण, बायकोनं मात्र नवऱ्याला माफ करावं अशी मागणी न्यायालयात केली. त्यानंतर बायकोच्या विनंतीचा विचार करत न्यायालयानं नवऱ्याला माफ केलं. अहमदाबादमधील ही सारी घटना आहे. 8 वर्षापूर्वी नूरजहाँ कचोट यांना नवरा इरफान आणि सासरच्या लोकांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. पण, शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे नूरजहाँ कचोट बचावली होती. यानंतर न्यायालयानं नवऱ्याची जेलमध्ये रवानगी केली. 3 वर्षानंतर नवरा जामीनावर सुटला. पण, आता बायकोनं नवऱ्याला माफ करा अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयानं देखील आता बायकोच्या विनंतीवरून नवऱ्याला माफ केलं आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांना ISIनं केली मारहाण; 40 तास केलं टॉर्चर

का केली बायकोनं विनंती

न्यायालयानं जामिन दिल्यानंतर इरफान नूरजहाँ कचोटसोबत राहू लागला. या काळात त्याच्या वागण्यात मोठा बदल झाला. शिवाय, इरफान - नूरजहाँ कचोट यांना एक मुलगी देखील झाली. दोघंही आपला संसार सुखानं करत आहेत. परिणामी नवऱ्याला शिक्षा मिळाल्यास त्याचा परिणाम हा कुटूंबावर होईल. त्यामुळे नवरा इरफानला माफ करा अशी विनंती नूरजहाँनं न्यायालयाला केली.

6 वर्षानंतर इरफानच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी नूरजहाँनं इरफानचा माफी देण्याची मागणी केली. इरफानमध्ये सध्या चांगलाच बदल झाला आहे.

VIDEO: मतदानानंतर भाजपने दिलेल्या आव्हानाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

First published: May 16, 2019, 1:11 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading