Home /News /national /

थरारक! 6 दिवस घरातून गायब होती पत्नी, परत येताच पतीने दिली आयुष्यभराची शिक्षा

थरारक! 6 दिवस घरातून गायब होती पत्नी, परत येताच पतीने दिली आयुष्यभराची शिक्षा

Crime News: पतीला न सांगता सहा दिवसांपासून घरातून गायब झाल्याच्या कारणातून एका पतीने आपल्या पत्नीचं नाक कापल्याची (husband slit wife's nose) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    शिवपुरी, 24 जानेवारी: पतीला न सांगता सहा दिवसांपासून घरातून गायब झाल्याच्या कारणातून एका पतीने आपल्या पत्नीचं नाक कापल्याची (husband slit wife's nose) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिला सहा दिवसांनतर आपल्या घरी परतल्यानंतर, पतीने अमानुषतेचा कळस गाठत आपल्या पत्नीचं धारदार चाकुने नाक कापलं आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं बैराड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम पतीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे, संबंधित घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील बैराडमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या सहा दिवसांपासून आपल्या पतीला न विचारता घराबाहेर गेली होती. सहा दिवसानंतर पीडित महिला घरी आली असता, आरोपी पतीनं तिला बेदम मारहाण केली आहे. तसेच त्याने 'कुठे गेली होतीस?' अशी विचारणा केली. पण पत्नीला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीचं चक्क नाकच कापलं आहे. हेही वाचा-लातूर: भरदिवसा पाडला रक्ताचा सडा; महाविद्यालयीन तरुणावर कोयत्याचे वार,पाहा VIDEO तसेच घटनेची तक्रार पोलिसांकडे दिली तर जिवे मारण्याची धमकीही तिच्या पतीने दिली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत पतीने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. आरोपी पतीच्या या धक्कादायक कृत्यानंतर पीडित महिलेनं बैराड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी पती बंटी जाटव याला बेड्या ठोकल्या आहेत. हेही वाचा-भयंकर! अनैतिक संबंधाचा झाला रक्तरंजित शेवट, हिंगोलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या बैराड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अरविंद चौहान यांनी याबाबत माहिती देताना म्हटलंय की, 6 दिवसांपूर्वी आरोपी बंटी जाटवची पत्नी त्याला माहिती न देता घरातून निघून गेली होती. ती घरी परत आल्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत हे कृत्य केलं आहे. पोलिसांनी आरोपी पती बंटीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या