केवळ 500 रूपयांसाठी पतीनं केली पत्नीची हत्या

Crime In Bihar : केवळ 500 रूपयांसाठी पतीनं पत्नीची हत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 08:59 AM IST

केवळ 500 रूपयांसाठी पतीनं केली पत्नीची हत्या

पाटणा, 27 जून : बिहारमधील कैमूर जिल्ह्यामध्ये पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वांना धक्का बसला. घटनेनंतर पोलिसांनी पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शिवाय, चौकशीला देखील सुरूवात केली. यावेळी समोर आलेल्या माहितीनंतर पोलीस देखील चक्रावून गेले. कारण, पतीनंच या महिलेची गोळी झाडून हत्या केली. पतीनं पत्नीकडे 500 रूपये मागितले होते. पण, पत्नीनं पैसे द्यायला नकार दिला. त्यामुळे रागावलेल्या पतीनं कानपट्टीवर बंदुक ठेवून पत्नीवर गोळी झाडली. कैमूर जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावातत हा घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पिस्तुल जप्त

घटनेनंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं. शिवाय, घराची झडती घेतल्यानंतर नऊ एमएमची पिस्तुल जप्त करण्यात आली असून 5 जिवंत काडतुसे देखील सापडली आहेत. महिलेचा पती हा गँगस्टर आरोपी आहे. महिनाभरापूर्वीचं दोघांचं लग्न झालं होतं. लग्नात मागितलेला हुंडा देखील देण्याची आल्याची माहिती महिलेच्या माहेरच्या लोकांनी दिली. हुंडा घेतल्यानंतर देखील पतीकडून त्रास सुरूच होता. अखेर एके दिवशी पतीनं केवळ 500 रूपयांसाठी पत्नीची गोळी झाडून हत्या केली.

VIDEO: मराठा आरक्षण वैध की अवैध? आज अंतिम फैसला, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...