• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • दोन लाखांमध्ये पत्नीला विकलं आणि घेतला भारीतला फोन, 2 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न!

दोन लाखांमध्ये पत्नीला विकलं आणि घेतला भारीतला फोन, 2 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न!

नव्या नोकरीनंतर काही दिवसांनी किशोर यानं त्याच्या पत्नीला बारान जिल्ह्यातल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला एक लाख 80 हजार रुपयांना विकलं.

नव्या नोकरीनंतर काही दिवसांनी किशोर यानं त्याच्या पत्नीला बारान जिल्ह्यातल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला एक लाख 80 हजार रुपयांना विकलं.

नव्या नोकरीनंतर काही दिवसांनी किशोर यानं त्याच्या पत्नीला बारान जिल्ह्यातल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला एक लाख 80 हजार रुपयांना विकलं.

  • Share this:
    ओडिशा, 23 ऑक्टोबर : स्मार्टफोन ( Smartphone) आता प्रत्येकाची गरज बनला आहे. आपल्याकडे एखादा चांगला  स्मार्टफोन असावा असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, असे महागडे फोन खरेदी करणं सर्वांनाच परवडेल असं नाही. महागड्या स्मार्टफोन खरेदीच्या हव्यासातून  ओडिशामध्ये (Odisha) पतीने पत्नीला विकल्याची घटना उघडकीस आली आहे. महागड्या स्मार्टफोनच्या मोहापायी पत्नीला एक लाख 80 रुपयांत दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा आरोप एका अल्पवयीन पतीवर असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर दोन महिन्यांनी पत्नीला राजस्थानमधल्या (Rajasthan) 55 वर्षांच्या एका व्यक्तीला 1 लाख 80 हजार रुपयांत विकल्याचा आरोप ओडिशातल्या बोलांगीर जिल्ह्यातल्या 17 वर्षांच्या किशोरवर आहे. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. असं वृत्त आज तक या वृत्तवाहिनीने दिले आहे. VIDEO : साध्याभोळ्या अंतराच्या बोल्ड डान्सने सोशल मीडियाचा वाढवला पारा याबाबत बेलपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी बुलु मुंडा यांनी सांगितलं, 'अल्पवयीन किशोरची सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून 24 वर्षांच्या युवतीशी ओळख झाली. त्यानंतर त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने विवाह करण्यास मान्यता दिली. लग्नानंतर दोन महिन्यांनी किशोरनं आर्थिक समस्या असल्याचं सांगून पत्नीला आपण दोघंही रायपूर येथे वीटभट्टीवर काम करून पैसे कमावू असं सांगितलं; पण प्रत्यक्षात तो पत्नीला घेऊन राजस्थानातल्या एका गावात गेला आणि तिची विक्री केली. 'मी माझ्या पत्नीची विक्री केली नसून, 60 हजार रुपयांसाठी तिला गहाण ठेवलं. मला पैशांची गरज असून सर्जरी करणंही आवश्यक आहे,` असा दावा किशोरनं केला आहे. ऑगस्टमध्ये हे दाम्पत्य एका वीटभट्टीवर कामासाठी जात असल्याचं सांगून रायपूर, झाशीमार्गे राजस्थानात पोहोचलं. नव्या नोकरीनंतर काही दिवसांनी किशोर यानं त्याच्या पत्नीला बारान जिल्ह्यातल्या एका 55 वर्षीय व्यक्तीला एक लाख 80 हजार रुपयांना विकलं. पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचं त्यानं कुटुंबीयांना सांगितलं. परंतु, मुलीच्या पालकांना वेगळीच शंका आली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड (Call Record) तपासलं असता, किशोर खोटं बोलत असल्याची शंका पोलिसांना आली. T20 World Cup : पाकिस्तानी क्रिकेटपटूची पत्नी आहे विराटची 'जबरा फॅन' दरम्यान, पत्नीला विकल्यानंतर किशोरनं खाण्यावर मोठी रक्कम खर्च केली. तसंच त्या पैशातून महागडा स्मार्टफोन (Smartphone) खरेदी केला. तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यासाठी बोलांगीरचे एसपी नितीन कुसाळकर यांनी पथकं तयार केली. 'आम्ही किशोरची चौकशी केली. त्या वेळी त्याने पत्नीला विकल्याचं सांगितलं. युवतीचा शोध घेण्यासाठी राजस्थानला पथकं रवाना करण्यात आली', असं कुसाळकर यांनी सांगितलं. ओडिशा पोलीस राजस्थानमधल्या बारान गावात युवतीच्या शोधार्थ पोहोचले असता त्यांना तिला सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. कारण ग्रामस्थ युवतीला सोडण्यास तयार नव्हते. आपण तिला 1 लाख 80 हजार रुपयांना खरेदी केल्याचं 55 वर्षांच्या व्यक्तीनं या वेळी सांगितलं. राजस्थान पोलीस (Rajasthan Police) कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ओडिशा पोलिसांचं पथक युवतीला नजीकच्या पोलीस ठाण्यात नेण्यात यशस्वी झालं. युवतीला ताब्यात घेतल्यानंतर तिनं ओडिशात आई-वडिलांकडे जायची इच्छा व्यक्त केली. ग्रामस्थदेखील तिला सोडण्यास तयार झाले. अशा पद्धतीनं युवतीची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं. दरम्यान, किशोरला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
    First published: