पतीने सर्च केला PORN व्हिडिओ, पहिलाच दिसला पत्नीचा फोटो आणि...

पतीने सर्च केला PORN व्हिडिओ, पहिलाच दिसला पत्नीचा फोटो आणि...

त्याने व्हिडिओमध्ये जे पाहिलं त्यामुळे त्याच्या पायाखालची जमिनच सरकली

  • Share this:

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : एक व्यक्ती आपल्या घरात बसून पॉर्न व्हिडिओ बघत होता. ते पाहत असताना अचानक त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. व्हिडिओमध्ये जी महिला कोणा पुरुषासोबत संबंध करत असताना दिसत होती, ती त्याची पत्नी होती. त्यानंतर मात्र पती वैतागला आणि त्याने तिला सोडून दिलं. हा व्यक्ती सॉफ्टवेयर इंजिनीयर आहे. हा 33 वर्षांचा तर त्याची डॉक्टर पत्नी 32 वर्षांची आहे. तिचा पती उत्तर प्रदेश आणि महिला डॉक्टर कलकत्ता येथे राहत होते.  दोघे एका मॅट्रीमोनियल साइटच्या मदतीने भेटले होते. दोन वर्षांपूर्वीच 2018 मध्ये त्यांचे लग्न झालं होतं.

लग्नापूर्वीच महिलाने पतीला तिच्या लग्नाआधीच्या नात्याची माहिती सांगितली होती. मात्र तिचा ब्रेकअप झाल्यानंतर तिने या मुलाशी लग्न केलं. दोघांचं विवाहानंतरच आयुष्य चांगलं सुरू होतं. मात्र महिला नेहमी आपल्या पतीला पॉर्न फिल्म पाहण्यासाठी जबरदस्ती करत असे. पतीदेखील तिचं ऐकतं होता. एकेदिवशी तिचा पती पॉर्न फिल्म बघत होता. व्हिडिओमध्ये जी महिला त्याला दिसली ती पाहून तो सैरभैर झाला. व्हिडिओमध्ये त्यानं पाहिलं, की त्याच्या पत्नीने अन्य पुरुषासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. पत्नीने सांगितले की हा व्हिडिओ त्याच्या लग्नापूर्वीच्या प्रियकरासोबतचा आहे. या व्हिडिओमुळे तो महिलेला ब्लॅकमेल करीत होता. य़ानंतर मात्र त्याने महिलेचे शांतपणे ऐकले. तिच्यावर विश्वास दाखवला आणि त्यानंतरही ते दोघे आनंदाने राहू लागले. ही बातमी जरी असली तरी लग्नाच्या नात्यात विश्वास किती महत्ताचा असतो याची प्रचिती या एका बातमीतून येते.

अन्य बातम्या

सियाचिनध्ये सैन्याचे मोठे हाल, थंडीने गारठून भारतीय जवानाचा मृत्यू

दूध प्यावे की नाही? एवढ्या रुपयांनी वाढणार किंमती, अमूलने दिले संकेत

 

First published: February 5, 2020, 12:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading