Home /News /national /

30 वर्षांपासून बेपत्ता असलेला पती अचानक घरी परतला, पत्नीनं घेतला मोठा निर्णय

30 वर्षांपासून बेपत्ता असलेला पती अचानक घरी परतला, पत्नीनं घेतला मोठा निर्णय

आपल्या आजूबाजूला काहीवेळेस अशा काही घटना घडतात की आपला त्यावर विश्वास बसणं अवघड असतं. अगदी एखाद्या चित्रपटात असतात तशा या घटना असतात.

     मुंबई, 4 ऑगस्ट : आपल्या आजूबाजूला काहीवेळेस अशा काही घटना घडतात की आपला त्यावर विश्वास बसणं अवघड असतं. अगदी एखाद्या चित्रपटात असतात तशा या घटना असतात. आताही आम्ही तुम्हाला जी घटना सांगणार आहोत ती अगदी ‘फिल्मी कहानी’सारखी आहे; पण प्रत्यक्षात घडलेली आहे. ही गोष्ट आहे बिहारमधल्या बक्सर जिल्ह्यातल्या कोरान सराय (Buxar) परिसरातील. इथल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असं समजून हिंदू धर्माप्रमाणे त्याची सर्व श्राद्धकार्यं वगैरे करण्यात आली. मात्र तीच व्यक्ती जवळपास 30 वर्षांनी घरी जिवंत परतली (Man returns After 30 years). पतीला जिवंत पाहून सहाजिकच त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. या घटनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. काय आहे प्रकरण? बक्सर जिल्ह्यातल्या कोरान सराय ठाणे (Koran Saray) परिसरातील राम अवतार साहू यांचा मुलगा घनश्याम हा गेल्या 30 वर्षांपासून बेपत्ता झाला होता. घनश्याम काही कामानिमित्त बक्सरला गेला होता; पण तो परत आलाच नाही. 30 वर्षांपूर्वी तो बेपत्ता झाला त्यावेळेस त्याची पत्नी, दोन मुलं हेही घरात होते. अचानक पती बेपत्ता झाल्यानंतर मुन्नीदेवीचं तर जसं काही जगच उद्ध्वस्त झालं. घनश्याम गायब झाला तेव्हा मुन्नी देवीचं वय 25 वर्षांचं होतं. तिला एक मुलगा, एक मुलगी होती. घनश्याम आज येईल, उद्या येईल अशी घरच्यांनी जवळपास 10 वर्षे वाट पाहिली. शेवटी 10 वर्षांनी त्यांनी त्याचे अंत्यसंस्कार केले; पण एक दिवस अचानक मुन्नीदेवीला झाशीतील पोलीस ठाण्यातून फोन आला. तिचा पती जिवंत असल्याची माहिती या फोनवरून तिला देण्यात आली होती. सहाजिकच मुन्नीदेवीला प्रचंड आनंद झाला. फुकट संस्कृतीचा अतिरेक : कलर टीव्ही ते चंद्रावर सहल, राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस मुन्नीदेवीनं लगेचच आपली मुलगी आणि जावयाला झाशीच्या पोलीस ठाण्यात पाठवलं. तिथे व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तिनं घनश्यामला ओळखलं. घनश्यामच्या शरीरावरील काही खास खूण पाहून त्याला ओळखल्याचं मुन्नीदेवीनं सांगितलं. घनश्यामच्या डाव्या पायावर तीळ आणि चामखीळ पाहून मुन्नीदेवीनं त्याला ओळखल्याची माहिती आहे. त्यानंतर मुन्नीदेवीचा मुलगा आणि जावई यांनी कादपत्रांची पूर्तता करून घनश्यामला घरी आणलं. घनश्याम घरी पोहोचल्यावर त्याच्या आसपास राहणाऱ्यांची भरपूर गर्दी जमली. त्याला पाहून अनेकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. पण 30 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला घनश्याम हाच आहे याची नंतर सगळ्यांची खात्री पटली. त्यानंतर मुन्नीदेवीसह घनश्यामनं घरात पूजा केली. Monkeypox : विमान प्रवासात घ्या एक काळजी, संसर्गापासून होईल तुमची सुटका 30 वर्षांपासून गायब झालेला घनश्याम परत आल्याने गावकरी, त्याचा मित्रपरिवारही खूश आहेत. अर्थात, घनश्यामची मानसिक अवस्था अजून पुरेशी चांगली नाही. इतकी वर्षे तो कुठे होता याबद्दल तो अजून काहीही नीट सांगू शकत नाही; पण घरच्यांना तो सुखरुप परत आला याचाच खूप आनंद आहे. मुन्नीदेवीलाही आपला नवरा परत आल्याचा  खूप आनंद झाला आहे. अगदी चित्रपटांत घडतं तशी ही घटना वाटते. घनश्याम कुठे होता, तो परत कसा आला. याबद्दल कदाचित तोच सांगू शकेल; पण तो परत आला हेच त्याच्या घरच्यांसाठी खूप आहे.
    First published:

    Tags: Bihar, Marriage, Wife and husband

    पुढील बातम्या