मराठी बातम्या /बातम्या /देश /

हम दिल दे चुके सनम पार्ट 2 : लव्ह मॅरेजनंतर पुन्हा झालं प्रेम, पतीच्या उपस्थितीत घेतली सप्तपदी

हम दिल दे चुके सनम पार्ट 2 : लव्ह मॅरेजनंतर पुन्हा झालं प्रेम, पतीच्या उपस्थितीत घेतली सप्तपदी

अगोदर लव मॅरेज झालं असताना आता या महिलेनं दुसरं लव मॅरेज (unique marriage story) करायचं नियोजन केलं. धक्कादायक म्हणजे हा प्रकार तिच्या नवऱ्याला समजल्यानंतर त्यानही विरोध न करता तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिचं लग्न लावून दिलं.

  • Published by:  News18 Desk

छपरा 28, मे : लव मॅरेज झालेलं, लग्नानंतर एक मूल ही झालं. त्यानंतर मात्र या महिलेचा दुसऱ्याच एकावर जीव जडला. अगोदर लव मॅरेज झालं असताना आता या महिलेनं दुसरं लव मॅरेज (unique marriage story) करायचं नियोजन केलं. धक्कादायक म्हणजे हा प्रकार तिच्या नवऱ्याला समजल्यानंतर त्यानही विरोध न करता तिच्या बॉयफ्रेंडसोबत तिचं लग्न लावून दिलं.

'हम दिल दे चुके सनम' (hum dil de chuke sanam) चित्रपटातील स्टोरीसारखी यांची कहानी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका मंदिरात त्या महिलेचं दुसरं लग्न पार पडलं. लग्न करून येताना तिचा अगोदरचा नवरा ती आणि झालेला नवीन नवरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार बिहारमधील घेघटा गावातील आहे. या प्रकारामुळं गावातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एक लव मॅरेज करून मन समाधान झालं नव्हतं काय? म्हणून आता दुसरं लग्न केलं, असं म्हणत काहींनी टीका केली आहे.

हे वाचा - Mumbai Crime लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रेयसीला प्रियकरानं दगडाने ठेचून मारलं

आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. आम्हाला एक मुलगीही आहे. मात्र, अलीकडं माझ्या बायकोचं दुसऱ्या एकावर प्रेम जडलं. यावरून मी खुशी खुशी त्यांचं लग्न लावून दिलं असं तिच्या पहिल्या पतीन सांगितलं. मात्र, लग्न झालेल्या निकी नावाच्या या महिलेनं महिला पती आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर पती मला मारहाण करत होता म्हणून मी हे दुसरं लग्न करण्याचा विचार केला, असं तिनं सांगितलं.

हे वाचा - घरच्यांचं किती प्रेम आहे पाहण्यासाठी रचली अपहरणाची कथा, मात्र पुढे घडलं भलतंच

दुसरा नवरा म्हणाला आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून एकत्र

निकी नावाच्या या महिलेने सांगितलं की, मी स्वखुशीनं हे दुसरे लग्न केलं आहे. आता मात्र मी माझ्या दुसऱ्या नवऱ्याला सोडणार नाही. नव्या नवऱ्यानंही अगोदरचा नवरा तिला त्रास देत असल्याचं सांगितले. आम्ही लग्नानंतर दोघेही आनंदी आहोत. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही एकत्र आहोत असेही तो म्हणाला. तर पहिल्या नवऱ्यानं आपण आपल्या मुलीचा चांगल्याप्रकारे सांभाळणार आहोत असं सांगितलं.

First published:

Tags: Bihar, Marriage