संशयातून नवऱ्याने घेतला बायको आणि 3 चिमुरड्या मुलींचा जीव, आत्महत्या करून स्वतःलाही संपवलं

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील शताब्दीपुरम भागामध्ये राहणाऱ्या एका माथेफिरू नवऱ्याने चारित्र्याच्या संशयातून स्वतःच्या बायकोची तीन लहानग्या मुलींसकट हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्याकांडानंतर नवऱ्यानेही आत्महत्या केली.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 07:56 PM IST

संशयातून नवऱ्याने घेतला बायको आणि 3 चिमुरड्या मुलींचा जीव, आत्महत्या करून स्वतःलाही संपवलं

एका माथेफिरू नवऱ्याने संशयातून स्वतःच्या बायकोची मुलांसकट हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोच्या डोक्यावर हातोड्याने वार करुन तिला आधी मारलं. मग निर्दयीपणे तीन मुलींच्या तोंडावर टेप बांधून हत्या केली. या सर्व प्रकारानंतर नवऱ्याने आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकलं. उत्तर प्रदेशातील गाजियाबादयेथील शताब्दीपुरम भागामध्ये ही घटना घडली.

हे हत्याकांड घडलं शुक्रवारी पहाटे. हे घडलं त्या घराशेजारी राहणाऱ्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4 वाजता मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. या आवाजाने शेजारच्या घरात राहणाऱ्या मंडळींना जाग आली. पण घर आतून बंद असल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला आणि त्यानंतर सर्व प्रकार समोर आला. तोपर्यंत नवऱ्यासह सगळं कुटुंब संपलं होतं.

या प्रकरणात आत्महत्या केलेल्या नवऱ्याचे नाव प्रदीप होते. प्रदीपचे वडील नौदलामधून निवृत्त झालेले आहेत. प्रदीपची पत्नी नर्सचं काम करत होती. त्याच्या तीन मुलींपैकी मनस्वी 8 वर्षांची होती तर, यशस्वी 5 आणि सर्वात लहान ओजस्वी 3 वर्षांची होती. या तीन मुलींची ही हत्या करण्यात आली.

प्रदीपचे नातेवाईक शेजारीच राहायचे.  त्याच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार मुलींचा किंचाळण्याचा आवाज आला तेव्हा त्यांना अचानक पहाटे जाग आली. हा सर्व प्रकार घडण्याआधी मात्र तिचा भाऊ म्हणजे प्रदीप खोलीच्या बाहेर बसला होता.

पोलिसांना आरोपी प्रदीपच्या खिशामध्ये एक सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये लिहिलेल्या मजकुरावून प्रदीपचा बायकोच्या चारित्र्यावर संशय होता, हे स्पष्ट होतं, असं पोलिसांनी सांगितलं. त्यामधूनच ही घटना घडल्याचं समोर येत आहे. प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...