विकृतीचा कळस! विवाहबाह्य प्रेमाला नकार दिल्यानं पत्नीच्या गुप्तांगात टाकलं बक्कल

विकृतीचा कळस! विवाहबाह्य प्रेमाला नकार दिल्यानं पत्नीच्या गुप्तांगात टाकलं बक्कल

रात्रभर महिला वेदनांनी विव्हळत होती पण पतीने तिला मदत केली नाही. उलट सकाळी तिला दारू पाजून तिला आणखी मारहाण केली.

  • Share this:

इंदौर, 14 मे : पत्नीने प्रेयसीशी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे पतीने तिच्या गुप्तांगामध्ये बेल्टचा बक्कल घातला. हे वाचल्यानंतर तुमचे विचार बंद होतील पण हा धक्कादायक प्रका मध्य प्रेदशच्या इंदौरमध्ये घडला आहे. यासंपूर्ण प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

प्रेयसीसोबत प्रेमसंबंध ठेऊ नको असं सांगितल्यानंतर चिडलेल्या पतीने दारूच्या नशेत पत्नीला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने तिच्या गुप्तांगामध्ये बेल्टचा बक्कल टाकला. रात्रभर महिला वेदनांनी विव्हळत होती पण पतीने तिला मदत केली नाही. उलट सकाळी तिला दारू पाजून तिला आणखी मारहाण केली.

शरमेपोटी महिलेने हा गंभीर प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण वर्षभरानंतर महिलेच्या पोटात इंफेक्शन झालं. त्यानंतर तिला रुग्णालयात भरती केलं गेलं. यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. पत्नीने या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात गेले असता महिलेच्या शरीराचा खूप दुर्घंध येत होता. तिचं पोट खूप फुगलं होतं. त्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतरच महिलेच्या पोटात काय टाकलं गेलं होतं याचा खुलासा होईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 'आदिवासी असल्यामुळे मी आणि माझा पती आम्ही दोघेही दारू पितो. पण लग्नानंतर पती एका मुलीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने मला रोज मारहाण केली. ज्यावेळी हा प्रकार झाला तेव्हा आम्ही दोघांनी दारू प्यायली होती. मला बेल्टने मारताना बेल्टचा बक्कल तुटला. रागाच्या भरात निर्दयीपणे त्याने तो माझ्या गुप्तांगाद टाकला. मी खूप ओरडले पण त्याने माझ्य़ावर दया दाखवली नाही.'

महिला पुढे म्हणाली की, 'मी बक्कलचा तुकडा काढण्याचा खूप प्रयत्न केला पण मला जमलं नाही. पण तरीदेखील पतीने मला खूप मारहाण केली आणि मला आणखी दारू पाजली. यानंतर त्याने मला घरातून हकलून दिलं.' महिलेने दिलेल्या या कबुलीनंतर आता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

VIDEO: सिंधुदुर्गातील दोन गावांमध्ये 6 हत्तींचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीती

First published: May 14, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading