मराठी बातम्या /बातम्या /देश /

पोटगी कमी करायला पतीनं लढवली शक्कल, पण असा आला गोत्यात

पोटगी कमी करायला पतीनं लढवली शक्कल, पण असा आला गोत्यात

घटस्फोटानंतर पोटगी मिळणे हा पत्नीचा हक्क आहे. मात्र अनेकदा पुरुषांकडून पोटगी देण्यास टाळाटाळ केली जाते.

घटस्फोटानंतर पोटगी मिळणे हा पत्नीचा हक्क आहे. मात्र अनेकदा पुरुषांकडून पोटगी देण्यास टाळाटाळ केली जाते.

घटस्फोटानंतर पोटगी मिळणे हा पत्नीचा हक्क आहे. मात्र अनेकदा पुरुषांकडून पोटगी देण्यास टाळाटाळ केली जाते.

    लखनौ, 21 डिसेंबर : वैवाहिक नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्यावर घटस्फोट (divorce) घेणं ही आता तशी सामान्य बाब झाली आहे. मात्र घटस्फोटानंतर पत्नीच्या (wife) हक्काची असलेली पोटगी (alimony) देण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करतात. आता समोर आलेल्या प्रकरणातही एका पतीनं केलेली अशीच टाळाटाळ आणि सोबतच बेकायदशीर कृत्य समोर आलं आहे. यात सध्या तरी प्रकरण पतीच्या विरोधात जात असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. मात्र तिला कमी पोटगी देण्यासाठी त्यानं एक शक्कल लढवली. पत्नीचा इनकम टॅक्स पासवर्ड हॅक करण्याचा त्यानं प्रयत्न केला. आयडी पासवर्ड हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा मेसेज पत्नीच्या मोबाईलवर येऊन पडला. यानंतर तिनं पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ठाकुरगंजचे असलेले एक बॅंक अधिकारी अक्षत विजय ( नाव बदललं आहे) यांची पत्नीसोबत घटस्फोट घेण्याबाबत केस चालली आहे. अक्षतला कोणीतरी सांगितलं, की पत्नीच्या इनकम टॅक्स रिटर्न कागदपत्रात जर पत्नीचं उत्पन्न त्यानं स्वत:पेक्षा जास्त दाखवलं, तर त्याला पोटगी कमी द्यावी लागेल. पतीनं लगोलग ही गोष्ट अमलात आणायचं ठरवलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अक्षतनं आयटीआर दाखल करण्यासाठी वापरायचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न केला. या छेडछाडीची माहिती पत्नीच्या मोबाइलवर आली. यानंतर पत्नीनं स्थानिक पोलिस ठाण्यात केस नोंदवली. पोलिसांचं म्हणणं आहे, की कुणाचीही खासगी माहिती कुणी वापरू शकत माही. असं करणं नियमांच्या विरुद्ध आहे. या प्रकरणात केस दाखल केली गेलीय आणि प्रकरण सायबर टीमकडे सोपवलं गेलं आहे. तपास पूर्ण झाल्यावर पुढची कारवाई केली जाईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Income tax, Uttar pradesh, Wife

    पुढील बातम्या