Home /News /national /

घरभाडं माफ करण्यासाठी घरमालकासोबत संबंध ठेवण्यास सांगत होता पती, पत्नीनं नकार दिल्यावर केला नात्याचा शेवट

घरभाडं माफ करण्यासाठी घरमालकासोबत संबंध ठेवण्यास सांगत होता पती, पत्नीनं नकार दिल्यावर केला नात्याचा शेवट

एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत केवळ लज्जास्पद कृत्य केलं नाही, तर त्यानंतर पत्नीला तिहेरी तलाकही (Divorce) दिला आहे.

    मेरठ, 27 नोव्हेंबर: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) एक विचित्र बातमी समोर येतेय. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत केवळ लज्जास्पद कृत्य केलं नाही, तर त्यानंतर पत्नीला तिहेरी तलाकही (Divorce) दिला आहे. या तलाकचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. घर मालकाशी शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवण्यास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला तलाक दिला आहे. नौचंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेचा लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पत्नीच्या आरोपानुसार, घराचं भाडं माफ करण्यासाठी आरोपी पती तिच्यावर घरमालकाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. भाड्याच्या बदल्यात घरमालकासोबत ठेवायला सांगत होता संबंध पीडितेच्या आरोपानुसार, तिचा पती तिच्यावर अनेक दिवसांपासून चुकीची कामे करण्यासाठी दबाव आणत होता आणि त्यासाठी त्याने मारहाणही केली. घराच भाडं माफ व्हावं म्हणून आरोपी पती तिला घरमालकाशी संबंध ठेवण्यास सांगत होता, असं पीडितेनं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर पीडितेनं विरोध केला असता तो तिहेरी तलाक देऊन फरार झाला. पीडितेनं पोलिसांत दिली तक्रार त्यानंतर पीडितेनं पोलिसांकडे जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेला दोन मुले आहेत तर एका मुलीचा आधीच मृत्यू झाला आहे. आरोपीला अंमली पदार्थांचेही व्यसन असल्यानं त्याने घरातील सर्व सामानही पळवलं. हेही वाचा- Corona च्या नव्या व्हेरिएंटनं वाढवली मुंबईची चिंता, पालिकेची आज महत्त्वाची बैठक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. पीडितेनं सासरच्या मंडळींवरही मारहाणीचा आरोप केला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttar pradesh news

    पुढील बातम्या