Whtsapp कॉलवरून दिला पत्नीला तलाक, 19 सेकंदांमध्ये तुटलं 19 वर्षांचं नातं

Whtsapp कॉलवरून दिला पत्नीला तलाक, 19 सेकंदांमध्ये तुटलं 19 वर्षांचं नातं

नव्या कायद्यानुसार आता पोलीस कारवाई करणार असून बंगळुरूमध्ये जाऊन पीडित महिलेच्या पतीला अटक करण्याचीही शक्यता आहे.

  • Share this:

भोपाळ 21 ऑगस्ट: तिहेरी तलाकचा कायदा संसदेत मंजूर झाल्यावरही देशात तलाक देण्याच्या अशा घटना कमी झालेल्या नाहीत. मध्य प्रदेशात अशीच एक घटना उघडकीस आली असून पतीने Whtsapp कॉलकरून पत्नीला तलाक दिला आणि 19 सेकंदांमध्ये 19 वर्षाचं नातं संपुष्टात आलं. पीडित महिलेला दोन मुलं असून तिने न्याय मिळण्याची मागणी केली आहे. आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिलेला न्याय देण्याचं आश्वासन देत कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. 'आज तक' ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

भोपाळच्या या महिलेचा पती बंगळुरुमध्ये एका हॉटेलमध्ये मॅनेजर आहे. गेल्या काही वर्षांपासून तो पत्नीला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून महिला माहेरी आली. पती हा सतत पैशाची मागणी करत होता.

घरी असलेल्या महिलेला पतीने फोन करून तीन वेळा तलाक म्हटलं आणि आता आपले संबंध संपल्याचं जाहीर केलं. हा फोन फक्त 19 सेंकद चालला आणि त्याने पत्नीला सोडून दिलं. नव्या कायद्यानुसार अशा पद्धतीने तलाक देता येत नाही.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आता या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलेने आता पोटगीची मागणी केलीय. नव्या कायद्यानुसार आता पोलीस कारवाई करणार असून बंगळुरूमध्ये जाऊन पीडित महिलेच्या पतीला अटक करण्याचीही शक्यता आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 21, 2020, 11:55 PM IST

ताज्या बातम्या