नवरा 7-8 दिवस अंघोळ करत नाही म्हणून हवा घटस्फोट

नवरा 7-8 दिवस अंघोळ करत नाही म्हणून हवा घटस्फोट

नवरा अंघोळ करत नाही म्हणून पत्नीनं चक्क घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

  • Share this:

इंदौर, 13 एप्रिल : घटस्फोट हवा म्हणून केव्हा नवरा दारू पितो, ससत भांडणं होतात अशी एक ना अनेक कारणं सांगितली जातात. काही वेळा सांजस्यपणा येऊन संसाराचा गाडा टिकतो देखील. पण, इंदौरमध्ये पत्नीनं पती सात ते आठ दिवस अंघोळ करत नाही. त्यामुळे त्याच्या अंगाला वास येतो . शिवाय, अंघोळ कर असं सांगितल्यास केवळ अत्तर लावून वेळ मारून नेली जाते असं म्हणत घटस्फोटाची मागणी केली आहे. इंदौर न्यायालयात सध्या या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. वर्षभरापूर्वी या दोघांचं इंटरकास्ट पण घरच्यांच्या संमतीनं लग्न झालेलं आहे. यानंतर इंदौरमधील कौटुंबिक न्यायालयानं दोघांना सहा – सहा महिने वेगळं राहावं लागेल असं म्हटलं आहे. न्यायाधीश आर. एन. चंद यांच्यापुढे सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

19 वर्षांपूर्वी घराघरात हवी होती स्मृती इराणींसारखी सून

भविष्याची देखील चिंता

23 वर्षाची मुलगी ही ब्राह्मण तर 25 वर्षाच्या मुलगा सिंधि आहे. मुलाचं बैरागड येथे दुकान आहे. मुलीनं लग्नानंतर सिंधि पद्धती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये तिला यश आलं नाही. शिवाय, पती घरातील सामान नीटपणे ठेवत नाही असं देखील पत्नीनं आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे. तसेच भविष्याचा विचार करता पती पैसे वाचवत नाही असं देखील पत्नीचं म्हणणं आहे. दरम्यान दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आता न्यायालयानं दोघांना सहा महिन्यांचा अवधी दिली आहे. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आता या प्रकरणामध्ये काय निर्णय होणार? दोघांचा संसार टिकणार का? न्यायालय काय निर्णय देणार? याकडे आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

VIDEO: 'भाजपसोबत राहायचं असेल तर...' बीडच्या सभेत मुख्यमंत्री आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading