मराठी बातम्या /बातम्या /देश /

गोड बोलून पत्नीला शेतात घेऊन गेला अन् कापले हातपाय; पतीची क्रूरता पाहून पोलिसांचा उडाला थरकाप

गोड बोलून पत्नीला शेतात घेऊन गेला अन् कापले हातपाय; पतीची क्रूरता पाहून पोलिसांचा उडाला थरकाप

Crime News: एका तरुणाने आपल्या पत्नीला गोड बोलून शेतात घेऊन जात तिचे हातपाय तोडल्याची (husband cut wife's hand and legs) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Crime News: एका तरुणाने आपल्या पत्नीला गोड बोलून शेतात घेऊन जात तिचे हातपाय तोडल्याची (husband cut wife's hand and legs) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Crime News: एका तरुणाने आपल्या पत्नीला गोड बोलून शेतात घेऊन जात तिचे हातपाय तोडल्याची (husband cut wife's hand and legs) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    रीवा, 22 डिसेंबर: एका तरुणाने आपल्या पत्नीला गोड बोलून शेतात घेऊन जात तिचे हातपाय तोडल्याची (husband cut wife's hand and legs) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणाने क्रूरतेच्या सर्व परिसीमा गाठत पत्नीवर खुरप्याने घाव घातले आहे. पतीची क्रूरता पाहून पोलिसांचा देखील थरकाप उडाला आहे. संबंधित जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. आरोपीनं नेमक्या कोणत्या कारणातून पत्नीवर इतका भयंकर हल्ला केला. याची माहिती अद्याप समोर आली नसून पोलिसांनी आरोपीला अटक (Accused husband arrested) केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा जिल्ह्यातील सेंदुरा गावातील आहे. तर रामकलेश कोरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी रामकलेश हा एका हाताने अपंग असून तो गुजरातमध्ये कामाला होता. अलीकडेच तो आपल्या गावी मध्य प्रदेशात परतला होता. गुजरातवरून आल्यानंतर, त्याचा 30 वर्षीय अपंग पत्नी लल्ली कोरी हिच्याशी कौंटुबीक कलह सुरू झाला होता. रविवारी घटनेच्या दिवशी देखील या दाम्पत्यामध्ये वाद झाला होता. हेही वाचा-पतंग पकडण्याच्या शर्यतीत जीवनाची शर्यत हरला; नाशकात चिमुकल्याचा हृदयद्रावक शेवट कौटुंबीक वादानंतर आरोपी रामकलेश आपल्या पत्नीला घेऊन शेतात गेला होता. शेतात गेल्यानंतर बेसावध असलेल्या पत्नीवर आरोपीनं खुरप्याने सपासप वार केले आहेत. आरोपीनं पत्नीचे हात आणि पाय धडापासून वेगळे केले. पतीनं हल्ला केल्यानंतर पत्नी जीवाच्या आकांताने ओरडत होती. किंचाळण्याचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर गावकऱ्यांनी जखमी अवस्थेतीत महिलेला रुग्णालयात दाखल केलं आणि घटनेची माहिती रायपूर करचुलियन पोलिसांना दिली. हेही वाचा-शिक्षकचं बनला राक्षस, सर्वांना सुट्टी देत पीडितेला सोडवायला लावलं गणित अन्... घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पतीची क्रूरता पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळावरून जखमी महिलेचे हातपाय जप्त करत रुग्णालयात आणले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया करत तुटलेले हातपाय पुन्हा जोडले आहेत. संबंधित महिलेची प्रकृती सध्या धोक्याच्या बाहेर असून डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Madhya pradesh

    पुढील बातम्या