अमर प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडले प्राण, सोबतच निघाली अंत्ययात्रा

अमर प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडले प्राण, सोबतच निघाली अंत्ययात्रा

एका विवाहीत जोडप्याचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्राही सोबत काढावी लागली.

  • Share this:

छपरा (बिहार), 11 नोव्हेंबर : याच आयुष्यात काय पुढच्या सात जन्मातही तुझ्या सोबत राहणार असल्याच्या शपथा प्रत्येक प्रेमी जोडपं घेतं. पण यात मनापासून शेवटपर्यंत साथ देणारे फार कमी असतात. याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाहीत जोडप्याचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्राही सोबत काढावी लागली. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू

हे प्रकरण जलालपूरच्या ठाणा परिसरातलं गम्हरिया गावातलं आहे. जिथे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निवृत्त सैनिकाचा मृत्यू झाला आणि त्याच्याच थोड्या वेळात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. काही क्षणात पती-पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे सगळ्या लोकांना एकच धक्का बसला. ही बातमी गावात पसरल्यानंतर सगळ्यांनी अंत्ययात्रेसाठी घरात गर्दी करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

इतर बातम्या - शिवसेनेच्या सत्ता स्थापनेवर सस्पेंस, पुन्हा बदलली राज्यपालांच्या भेटीची वेळ

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी निवृत्त सैनिक रामेश्वर प्रसाद यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ नजिकच्या स्थानिक रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पतीच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या पत्नी कृष्णा देवी यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यातून त्या स्वत:ला सावरू शकल्या नाही.

एकाच वेळी निघाली पती-पत्नीची अंत्ययात्रा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा देवी यांना पतीचा मृत्यू झाल्याची बातमी मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. ते त्यांचं मानसिक संतूलन हरवून बसल्या आणि याच धक्क्यात त्यांनी आपले प्राण सोडले. एकाच वेळी गावातून या जोडप्याची अंत्ययात्रा निघाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या सगळ्या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस मृत पती-पत्नीच्या कुटुंबीयांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - साताऱ्यामध्ये सापडले तब्बल 13 गावठी बॉम्ब, महाराष्ट्रात खळबळ

Published by: Renuka Dhaybar
First published: November 11, 2019, 5:19 PM IST
Tags: Bihar News

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading