पोलिसांचा कारनामा! महिलेच्या हत्येप्रकरणी पतीसह सासू-सासरे होते तुरुंगात आणि ती परतली जिवंत

पोलिसांचा कारनामा! महिलेच्या हत्येप्रकरणी पतीसह सासू-सासरे होते तुरुंगात आणि ती परतली जिवंत

पोलिसांनी मारहाण करून पत्नीच्या हत्येची कबुली घेतली आणि सहा महिने तुरुंगात काढल्यानंतर ती जिवंत परतली.

  • Share this:

पाटणा, 15 जानेवारी : सहा महिन्यापूर्वी पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीसह सासू सासऱ्याला अटक करण्यात आली होती. त्यांची रवानगी तुरुंगात केल्यानंतर अचानक पत्नी जिवंत परत आली. हे एखाद्या चित्रपटाला शोभेल असं कथानक वाटत असलं तरी बिहारमधील सुपौल इथं हा प्रकार घडला आहे. पोलिसांच्या कारनाम्यामुळे निर्दोष असलेल्यांना तुरुंगात सहा महिने काढावे लागले. सून जिवंत असतानाही सहा महिने तुरुंगात काढल्यानंतर सुटका झालेल्या पती आणि सासऱ्याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

सोनिया नावाची महिला सहा महिन्यापूर्वी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या पतीसह सासरच्या मंडळींना हत्येप्रकरणी अटक झाली होती. तेव्हा पोलिसांनी आपले म्हणणे गांभीर्याने घेतले नाही असा आरोप सोनियाचे पती रंजीत यांनी केला आहे. रंजित यांनी म्हटलं की, आम्ही राघोपूर ठाण्यात पोलिसांसमोर गुढघे टेकून सांगत होतो. त्यांनी ऐकलं नाही. आम्हाला दोन दिवस मारहाण केली. जोपर्यंत आम्ही हत्या केल्याचं मान्य केलं नाही तोपर्यंत आम्हाला मारहाण केली.

रंजित म्हणाले की, पोलिसांना वारंवार सांगितलं की अज्ञात मृतदेह पत्नीचा नाही. पण तरीही पोलिसांनी गुन्हा कबूल करण्यासाठी जबर मारहाण केली. त्यानंतर 30 मे रोजी आई-वडिलांसह तिघांना तुरुंगात डांबण्यात आलं.

मृत्यू झाल्याचे समजून एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अचानक सहा महिन्यांनी सोनिया पोलिस ठाण्यात पोहचली. तेव्हा आपण कोरियापट्टी इथले रहिवासी जनार्दन पासवान यांची मुलगी असल्याचं सांगितलं. सोनियासोबत बेलवर सुटलेली तिची सासू गीता देवी होत्या. सुरुवातीला पोलिससुद्धा तिचे म्हणणे ऐकल्यानंतर हैराण झाले होते.

पीडित मुलगी 19 वर्षीय तरुणासोबत सापडली, तब्बल 1700 किलोमीटर दूर लागला शोध

गेल्या वर्षी 26 मे रोजी तेलवा इथं एका युवतीचा छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. तेव्हा त्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून तीन दिवस पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. दरम्यान, वृत्तपत्रात आलेल्या बातमीत म्हटलं होतं की, राघोपूर इथले रहिवासी जनार्दन पासवान आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांत जाऊन मृत व्यक्ती आपली मुलगी सोनिया असल्याचा दावा केला होता.

तरुणीने भाऊजीसोबत ठेवले शारीरिक संबंध, नवऱ्याने मंडपातच दाखवला SEX व्हिडिओ

जनार्दन पासवान यांनी आपल्या मुलगीचा हुंडाबळी घेतल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळींवर केला होता. त्यांची मुलगी सोनिया ही 26 मेपासून बेपत्ता होती. पोलिसांनी मृतदेह पासवान यांच्याकडे सोपवला. त्यावर विधिवत अंत्यसंस्कारही झाले. त्यावेळी सोनियाच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर आरोप केला होता की, बेपत्ता होण्याच्या दोन दिवस आधी तिच्या पतीने तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी सोनियाचा पती रंजित पासवान, सासरा जीतन पासवान, सासू गीता देवी यांना अटक करून तुरुंगात रवानगी केली होती.

बेपत्ता झाल्यानंतर सोनिया एका अनोळखी मुलीसोबत दिल्लीला गेली होती. तिथं सोनियाला समजलं की, तिचा पती आणि सासू-सासरे जेलमध्ये तिच्याच हत्येप्रकरणी तुरुंगात आहेत. त्यानंतर सोनियाने पोलिस ठाण्यात धाव घेऊन सगळा प्रकार सांगितला.

जमिनीत घुसली बस, 6 जणांचा मृत्यू, हा VIDEO चुकवेल काळजाचा ठोका

Published by: Suraj Yadav
First published: January 15, 2020, 7:39 AM IST
Tags: biharcrime

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading