हुर्रियत नेत्यांच्या मुसक्या आवळणार, फुटीरतावाद्यांवर येणार बंदी?

हुर्रियत नेत्यांच्या मुसक्या आवळणार, फुटीरतावाद्यांवर येणार बंदी?

पाकिस्तानची ISI ही गुप्तचर संस्था या नेत्यांना अर्थपुरवढा आणि विचारांचाही पुरवढा करत असते.

  • Share this:

नवी दिल्ली 1 मार्च  : केंद्र सरकार जम्मू आणि काश्मीरमधल्या फुटीरतावादी नेत्यांचा मुसक्या आवळण्याचा विचार करत आहे. हुर्रियत नेत्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र तयार करत असून तो प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं होतं.

जम्मू आणि काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांच्या भूमिकेविषयी कायम वाद राहिला आहे. हे नेते स्वतंत्र काश्मीरची मागणी करत असतात. आम्हाला भारत आणि पाकिस्तान जायचं नाही तर स्वतंत्र काश्मीर पाहिजे अशी या नेत्यांची भूमिका असली तरी हे सर्व नेते पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करतात.

पाकिस्तानची ISI ही गुप्तचर संस्था या नेत्यांना अर्थपुरवढा आणि विचारांचाही पुरवढा करत असते. त्यातूनच हे नेते दहशतवाद्यांना पाठिंबा देतात आणि स्थानिक तरुणांची डोकी भडकावतात असा भारताचा आरोप आहे. अनेकदा या नेत्यांशी केंद्र सरकारने चर्चाही केली होती मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

मसूद अजहर पाकिस्तानातच

कुख्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानाच आहे, अशी कबुली आता पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली आहे. याधी पाकिस्तानकडून मसूद अजहर आमच्या देशात नसल्याचा दावा केला जात होता. आता मात्र हा खोटारडेपणा उघड झाला आहे.

'मसूद अजहर पाकिस्तानात असून त्याला सध्या आजारानं ग्रासलं आहे. तो घराबाहेरही पडू शकत नाही. भारताने त्याच्या कृत्यांबाबत पुरावे द्यावेत. आम्ही कारवाई करू,' असं शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा धक्का बसला. कारण, जैश ए मोहम्मद या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावं आणि जैशचा म्होरक्या मसूद अजहर यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या या संघटनेसह पाकिस्तानच्या अडचणीमध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे.

हा VIDEO पाहिल्यानंतर तुमचाही उर अभिमानानं भरून येईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 02:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading