News18 Lokmat

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव; 63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

तामिळनाडूतल्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता होती त्या सर्व भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2018 08:29 AM IST

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर ‘गाजा’चं तांडव;  63 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

तामिळनाडू, 16 नोव्हेंबर : ‘गाजा’ नावाचं चक्रीवादळ मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. यावेळी 90 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. नागपट्टनम आणि वेदारनियमदरम्यानच्या पश्चिम आणि दक्षिण समुद्र किनाऱ्याला पार करत हे चक्रीवादळ आणखी पुढे सरकलं आहे. पुढील काही तासात त्याचा जोर हळूहळू कमी होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

हवामान खात्यानं तामिळनाडूच्या ज्या-ज्या भागात हे वादळ धडकण्याची शक्यता वर्तवली होती, त्या सर्व भागातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 63 हजार 203 नागरिकांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं असल्याची माहिती तामिळनाडू राज्य सरकारनं दिलीय. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांच्या सुविधेसाठी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.

तामिळनाडूतल्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता होती त्या सर्व भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा नागपट्टनमला बसला आहे. तेथील 1 हजार 313 लोकांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं होतं. तर अजूनही सखोल भागात अडकलेल्या नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यातचं काम युद्ध स्तरावर सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी न्यूज18 ला दिली.

हे ‘गाजा’ वादळ आधी आंध्रप्रदेशला धडक देईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु ‘गाजा’ने अचानक तामिळनाडूकडे वळण घेतलं आहे.


Loading...

VIDEO : एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 08:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...