कर्नाटकात त्रिशंकू? भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर!

कर्नाटकात त्रिशंकू? भाजप आणि काँग्रेसमध्ये 'कांटे की टक्कर', जेडीस ठरणार किंगमेकर!

कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीचे निकाल सगळ्यांना गोंधळात टाकणारे असतील असा अंदाज निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणांमध्ये व्यक्त करण्यात आलय.

  • Share this:

बंगळुरू,ता.24 एप्रिल: कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीचे निकाल सगळ्यांना गोंधळात टाकणारे असतील असा अंदाज निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणांमध्ये व्यक्त करण्यात आलय.

सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई असून राज्यात त्रिशंकू विधानसभेची शक्यता आहे तर सत्तेच्या चाव्या जनता दल धर्मनिरेपक्षकडे(जेडीएस) राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

कर्नाटकात 1985 पासून कुठल्याही सरकारला पुन्हा संधी मिळालेली नाही. अॅण्टीइन्क्बंसीचा फटका राज्य सरकारांना बसला आहे. त्यामुळं सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धारामय्यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. कर्नाटक विधानसभेत एकून 224 जागा असून बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे.

फक्त सी-फोर नं काँग्रेसला बहुमत दिलं असून 119 ते 120 च्या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय. सीएचएसने काँग्रेसला 77 ते 81, भाजपला 73 ते 76 आणि जेडीएस 64 ते 66 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलाय. तर टी.व्ही 9 आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेत काँग्रेसला 102, भाजपला 96 आणि जेडीएस 25 जागा मिळतील असं अंदाज व्यक्त केलाय.

सी फोर नं केल्या सर्व्हेत लोकांनी मुख्यमंत्री सिद्धारामय्यांना सर्वाधिक 45 टक्के लोकांनी पसंती दिलीय. येडियुरप्पांना 26 टक्के तर एच.डी. कुमारस्वामींना 13 टक्के लोकांनी पसंती दिलीय.

कसे आहेत सर्व्हे?

सी-फोर - काँग्रेसला बहुमत, 119 ते 120 जागा

सीएचएस - काँग्रेस 77 ते 81, भाजप 73 ते 76 आणि जेडीएस 64 ते 66

टी.व्ही-9, सी-व्होटर - काँग्रेस 102, भाजप 96, जेडीएस-25

मुख्यमंत्रीपदासाठी पसंती

सी फोर - सिद्धारामय्या - 45 टक्के, बी.एस येडियुरप्पा 26 आणि एच.डी. कुमारस्वामी 13 टक्के

First published: April 24, 2018, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading