Home /News /national /

स्मशानभूमीबाहेर शेकडो मृतांच्या अस्थिंचा ढिगारा; कोरोनाच्या भीतीने अस्थी घेण्यासाठी कुटुंबीयांचा नकार

स्मशानभूमीबाहेर शेकडो मृतांच्या अस्थिंचा ढिगारा; कोरोनाच्या भीतीने अस्थी घेण्यासाठी कुटुंबीयांचा नकार

कोरोनामुळे लोकांमध्ये इतकी भीती निर्माण झाली आहे की ते आपल्या नातेवाईकाच्या अस्थिंचं विसर्जन करण्यासाठी येत नाहीत. अनेक ठिकाणी तर या अस्थी डम्पिंग ग्राऊंडवर फेकण्यात येत आहे.

    अहमदाबाद, 8 ऑक्टोबर : सुरुवातीच्या काळात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांमध्ये कोरोना महासाथीची भीती स्पष्टपणे दिसून येत आहे. आता तर लोकांमध्ये कोरोनाची इतकी भीती निर्माण झाली आहे की ते आपल्या कुटुंबीयांची अस्थी घेण्यासाठीदेखील स्मशानभूमीत येत नाहीत. याशिवाय कोरोना रुग्णांचे मृतदेहावरही कोरोना वॉरियर अंत्यसंस्कार करीत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक स्मशानभूमीत मुस्लीम ड्यूटी देत आहेत. गुजरातमध्ये  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांबद्दल सांगायचं झाल्यास तब्बल 900 लोकांच्या अस्थी अद्यापही स्मशानभूमीत पडून आहेत. अनेक ठिकाणी अस्थिंचा ढीग लागला आहे. हे ही वाचा-कोरोना काळात इतकं उपयुक्त आहे नारळाचं तेल; तुम्ही विचारही केला नसेल मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये 450 आणि भरूचमध्ये 200 मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच आले नाहीत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर नवसारीमध्ये 222. अंकलेश्वरमध्ये 210 आणि जामनगरमध्ये 160 मृतकांची अस्थी घेण्यासाठी कोणी आलं नाही. सुरेंद्रनगर स्मशानगृहात अस्थिंचा ढीग लागला आहे आणि मृतकांची अस्थी घेण्यासाठी कोणी आले नाही. कोरोनाच्या भीतीने नातेवाईक अस्थी घेण्यासाठी येत नाहीत. अनेक ठिकाणी तर या अस्थी डम्पिंग ग्राऊंडवर फेकण्यात येत आहे. हे ही वाचा-कोरोनाचा कोरोनाशी लढा; गंभीर विषाणूला रोखतोय Common cold corona जामनगरमध्ये स्मशान गृहाच्या समितीचे सदस्य दर्शन ठक्कर यांनी सांगितले की, जामनगरमधील स्मशानगृहात 387 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यापैकी 80 टक्क्यांहून जास्त मृतकांचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी आले नाही. याशिवाय अहमदबादमध्ये आतापर्यंत 1812 लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यामध्ये 450 मृतकांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय आलेच नाहीत. याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णांला अग्नी दिल्यानंतर त्याच्या शरीरातील कोरोनाचे अंश पूर्णपणे नाहीसे होतात. अशात अस्थी आणि राखेपासून भीती नाही. मात्र असे असतानाही कुटुंबीय आपल्या नातेवाईकांच्या अस्थी घेण्यासाठी येत नाहीत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Gujrat

    पुढील बातम्या