शिवणकामाच्या नावे निघाले होते मुलींना विकायला, पोलिसांनी केली 12 युवतींची सुटका

शिवणकामाच्या नावे निघाले होते मुलींना विकायला, पोलिसांनी केली 12 युवतींची सुटका

दररोज मुलींच्या संबंधित धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. त्यापैकी रविवारी सकाळी आणखीन हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे.

  • Share this:

हाथरस, 11 ऑक्टोबर : हाथरस प्रकरणाने देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी नवीन धक्कादायक माहिती रोज समोर येत असतानाच आता आणखीन एक भयंकर घटना समोर आली आहे. हाथरस इथे रस्त्यावर अल्पवयीन मुलगी सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मुलीला काम देण्याच्या नावे आणण्यात आलं होतं मात्र एका घरात बंदिस्त करून ठेवण्यात आलं.

या अल्पवयीन मुलीनं जी पोलिसांना माहिती दिली त्यावरून धक्कादायक प्रकरण असल्याचं कळत आहे. शिवणकाम देण्याच्या नावाखाली 12 मुलींना एकत्र आणलं आणि एका खोलीत डांबून ठेवलं होतं. तीन दिवसांपासून या मुलींना ना खायला ना पाणी देखील मिळालं आहे. या संपूर्ण घटनेचा उलगडा तिथून पळून आलेल्या अल्पवयीन मुलीनं केला आहे.

हे वाचा-उत्तर प्रदेशात घेतले स्वस्तात पिस्तुल, आणले विकायला कल्याणमध्ये, पण...

उत्तर प्रदेशातील रोडवेज स्टँड जवळ ही मुलगी मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली. या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे. मुलीची फिर्याद नोंदवण्यात आली असून ह्यूमन ट्रेफिकिंग रॅकेट हाथरसमध्ये सक्रिय असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीची माहिती घेतली असून सध्या त्या दिशेन तपास सुरू करण्यात आला आहे. शिवणकाम देण्याच्या बहाण्यानं या मुलींना विकण्याचा डाव होता. त्यासाठी या मुलींना एका रॅकेटनं घरात डांबून ठेवलं होतं. या मुलींनी तिथून पळ काढला असून त्यातल्या अल्पवयीन मुलीनं पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी या तरुणींची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 11, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या