Home /News /national /

#HumanStory: बिडी पिण्यासाठी जखमी तरुणीने ऑपरेशन थांबवलं, नाकाची गरज नाही म्हणून निघून गेली

#HumanStory: बिडी पिण्यासाठी जखमी तरुणीने ऑपरेशन थांबवलं, नाकाची गरज नाही म्हणून निघून गेली

एक मुलगी नदीवरून पाणी घेऊन घरी परतली. आता ती स्वयंपाक करतेय. अचानक मुलीच्या चेहऱ्यावरून पदर सरकतो आणि समजतं की तिचा चेहरा भाजला आहे. चेहरा वाईट रीतीने जळालेला असतो.

    नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : दाट जंगल, तिन्ही बाजूंनी वाहणारं पाणी, सर्व बाजूंनी पर्वत. अशात एक मुलगी नदीवरून पाणी घेऊन घरी परतली. आता ती स्वयंपाक करतेय. अचानक मुलीच्या चेहऱ्यावरून पदर सरकतो आणि समजतं की तिचा चेहरा भाजला आहे. चेहरा वाईट रीतीने जळालेला असतो. एक डोळा बंद. नाकाच्या जागी खड्डा, ओठांवरच्या जागी काळा डाग. स्वयंपाक झाला ती जेवली आणि माझा अपूर्ण चेहरा इथे पूर्ण होईल. अशा इच्छेने रुग्णालयात निघते. वाचा पद्मश्री प्लॅस्टिक सर्जन डॉ. योगी एरन यांना, त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक घटना. अमेरिकेतील एक अप्रतिम हॉस्पिटल. एक अतिशय सुंदर मुलगी भेटायला आली. चेहरा झाकला होता कारण डोळ्याजवळ तिळ होतं आणि ते तिला काढायचं होतं. खरंतर अशी अनेक व्यर्थ प्रकरण रुग्णालयात समोर यायची. त्याचा योगी यांना प्रचंड राग यायचा. एकीकडे रुग्णांचे असे चोचले तर दुसरीकडे, भारतातील जंगलं, खेड्यांमध्ये राहणारे लोक. त्यांचा चेहरा किंवा हात-पाय जळलेले असतात. परंतु उपचारांसाठी पैसा नाही. योगी म्हणतात, मी माझ्या देशाला खूप मिस करतो. पण इथे खेड्यांमध्ये अनेक रुग्ण माझी वाट पाहत असतात. डॉ योगी एरन यांना त्यांच्या कार्याबद्दल यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1933मध्ये देहरादून शहराबाहेर गेले आणि हॉस्पिटल सुरू केलं. त्याचवेळी एक बाई माझ्याकडे आली. जंगलात मोहाची फुलं गोळा करताना एका अस्वलाने तिच्यावर हल्ला केला. तिच्या सर्व चेहऱ्यावर जखमा होत्या. दोन्ही जबडे गायब होते. एक डोळा नाहीसा झाला. नाकाऐवजी दोन खड्डे. तिला पाहून मी शस्त्रक्रिया सुरू केली. हळूहळू जबडे तयार केले. मग ओठ तयार केले. त्यानंतर मी तिचं नाक बनवायला जाताच तिने मला अडवलं. त्यानंतर ती जे बोलली त्याने आजही मन सुन्न होतं. तिने मला सर्जरी करताना थांबवलं आणि म्हणली की, 'डॉक्टर तुम्ही माझे ओठ बनवले आहेत तर पुरे झालं. मला नाक नसलं तरी चालेल. बिडी पिण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी ओठ आहेत माझ्याकडे. मला नाकाची गरज नाहीये.' हे ऐकल्यावर मी थांबलो आणि ती निघून गेली. ही घटना वाचण्यासाठी जरी सोपी वाटली तरी याच्या खोलवर जाणं महत्त्वाचं आहे. आताच्या सोशल मीडियाच्या जगात सौंदर्य ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. पण आपल्या देशात अशी पण शहरं आहेत जिथे सौंदर्यासाठी आरसा सोडा साधी हवा पण फिरकत नाही. इथली तरुणाई व्यसनासाठी जगते. इतर बातम्या - #HumanStory: पाळी आल्यावर सुट्टी टाकली की कापला जायचा पगार, 24 वर्षांच्या तरुणीने कंटाळून काढलं गर्भाशय... पहाडी भागात ज्वलनाचे प्रकार दररोज घडतात. बरीच मुलं जन्मापासूनच जळालेली असतात. अशात एक मूल आलं. डोक्यापासून बोटापर्यंत मक्याच्या कणसासारखे जळलेला. तो जळाला कारण त्याची आजी रोज त्याला सिगारेटच्यावर ठेवून धुरी द्यायची. एकदा असचं करताना हात हलला आणि मुल सिगारेटवर पडलं. असं हे काही एकमेव प्रकरण नाही. घराजवळ आग लागली असताना मुलाला तसंच ठेऊन पालक कामावर गेले. कधी पाणी आणण्यासाठी जातात तर कधी मजुरीवर. खेळणारी मुलगी आगीत जळून खाक झाली. पण पैसा आणि पोटाची खळगी महत्त्वाची असते. आता मला सांगा शहरांत राहून याचा आपल्यावर काय परिणाम होतो. अ‍ॅसिड हल्ल्याचा शिकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुजफ्फरनगरमध्ये एका मुलीचा  चेहरा पाहून आत्मा कंपित झाला. ती बरीच टक्के भाजली होती. तिचा नवरा तिच्यावर संशय घ्यायचा. एकदा ती झोपेत असताना त्याने  पत्नीच्या चेहऱ्यावर एक बादली सल्फरिक अॅसिड ओतलं. पण तरुणी शूर होती. तिने हे सगळं सहन करत अखेर ती आयुष्याची लढाई हारली. अॅसिड हल्ला झालेल्या तरुणी सोबत येताना जुना फोटो घेऊन येतात. फुलासारख्या नाजूक मुली, डोळ्यांत आयुष्याची चमक आणि जिवंत राहण्याचं स्वप्न असतं. चेहऱ्यावरच्या वेदनांमुळे त्यांच्या डोळ्यांतून पाणी नाही अॅसिड पडत असतं. जळलेल्या रूग्णांकडे पहात मी जंगल आणि पाण्याच्या दरम्यान एक रुग्णालय बांधलं. जेव्हा मी गरिबांना विनामुल्य मदत करण्याचं ठरवलं तेव्हा श्रीमंत लोक अस्वस्थ झाले. म्हणून ते किरकोळ जखमा घेऊन उपचारासाठी येतात. ते स्वत: ला गरीब म्हणतात. पण मी त्यांचाही फुकट इलाज करतो. (टीपः यावर्षी प्रजासत्ताक दिनी डॉ. योगी एरन यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले. न्यूज 18 हिंदीला दिलेली ही खास मुलाखत या निमित्ताने हे मुद्दे समोर आले.)
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Acide attack, Uttarakhand

    पुढील बातम्या