लंडनहून आलेला हा 'मटकामॅन' दिल्लीकरांना पाजतोय पाणी

लंडनहून आलेला हा 'मटकामॅन' दिल्लीकरांना पाजतोय पाणी

अलगरत्नम नटराजन लंडनहून आपला सर्व बिझनेस सोडून भारतात परतले. दिल्लीत लोकांची तहान भागवण्याचं काम ते करतात. त्यांची ही जीवनकहाणी त्यांच्याच शब्दात वाचा

  • Share this:

नंदिनी दुबे, प्रतिनिधी

दिल्ली, 09 जानेवारी : मी लंडनमध्ये राहात होतो, तेव्हाची ही गोष्ट. तिथे माझं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं. गिफ्ट शाॅप होतं माझं. चांगला बिझनेस चालला होता. संध्याकाळी बायको-मुलीबरोबर वेळही जायचा. माझं आयुष्य अगदी स्वप्नवत चाललं होतं.

अचानक एक दिवस धक्कादायक गोष्ट कळली. ती म्हणजे मला मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाला होता. आयुष्याचा वेग अचानक थांबला. नंतरचा बराच काळ उपचारात गेला. त्यानंतर मी विचार केला लंडन सोडून भारतात परत यायचं. पण मी भारतात आलो ते बंगळुरूला नाही तर दिल्लीला. माझ्या बायकोच्या शहरात.

साऊथ दिल्लीत मी माझी बायको आणि सासूबरोबर राहत होतो. सेविंग्ज होती, म्हणून ठीक चाललेलं. फावल्या वेळात एनजीओसोबत काम करायचो. कॅन्सर हाॅस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करायचो. अनाथआश्रमात काम करायचो. गरीब लोकांना त्यांचे अंत्यसंस्कार करायला मदत करत होतो.


एक दिवस लोधी रोडवरून जात होतो. मी एका स्काऊट हाऊसच्या बाहेरून जात होतो. बाहेर एक वाॅटर कूलर ठेवला होता. तिथे एक रिक्षावाला पाणी पित होता. ते पाहूनच मला कल्पना सुचली. आपणही लोकांची तहान भागवायचं काम करू शकते की. हळू हळू घराबाहेर सुरू झालेल्या या प्रवासानं वेग पकडला. माझ्या कुटुंबातलेही खूश झाले. बायकोला थोडी काळजी वाटत होती. पण तिनं मला अडवलं नाही.


वाॅटर कुलरसाठी बरेच पैसे लागले असते. म्हणून मी पाण्याचे माठ ठेवण्याचं काम केलं. लोकांना वाटायचं यासाठी मला सरकार मदत करतंय. पण मला ना सरकार, ना कोणी संस्था मदत करतेय. काही लोकही मग स्वत:हून यात सामील झालेत. काही जण दानही देतात.

या सगळ्यासाठी मी एका व्हॅनमध्ये 800 लीटरचा टँकर, पंप आणि जनरेटर लावलाय. त्यामुळे माठांमध्ये पाणी भरलं जातं. त्यासाठी मी दिवसातून 4 वेळा चक्कर मारतो. उन्हाळ्यात रोज दोन हजार लीटर पाण्याची गरज लागते. याशिवाय शहरात 100 सायकल पंप लावलेत. गरीब लोक सायकलमध्ये हवा भरू शकतात.PHOTOS : मेहंदी रंग लाएगी...विक्रांत-ईशाच्या लग्नाची तयारी जोरात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या