मुस्लिमांनी गाव सोडलं, मात्र हा हिंदू तरुण करतोय मशिदीची देखभाल

मुस्लिमांनी गाव सोडलं, मात्र हा हिंदू तरुण करतोय मशिदीची देखभाल

धर्मावरुन देशामध्ये विभाजन होत असताना बिहारमधील एक तरुण आशेचा दिवा जागवत आहे

  • Share this:

बिहार, 15 जानेवारी : धर्मावरुन देशामध्ये विभाजन होत असताना बिहारमधील एक तरुण आशेचा दिवा जागवत आहे. या दिव्याच्या प्रकाशाने कदाचित धर्मांधता पसरवणाऱ्यांच्या  मनात प्रेमाचा प्रकाश उमटेल, हीच त्याची आशा. मारी नावाचे एक गांव. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील या मारी गावांत अवघी 3000 लोकसंख्या असेल.

कच्च्या-पक्क्या घरांमध्ये राहणारी ही साधी माणसं. अजय पासवान हा याच गावातला. गावातील एकमेव जुन्या अशा या मशिदीची तो गेल्या 10 वर्षांपासून देखरेख करतोय. एखाद्या मुस्लिमासारखा... ही जबाबदारी त्याच्यावर कुणी सोपवली नाही. ही त्याने स्वत:च्या इच्छेने घेतली. काही वर्षांपूर्वी या गावातील अनेक कुटुंबं रोजगाराच्या शोधात गाव सोडून गेली. यामध्ये मुस्लीम कुटुंबीयांबरोबरच हिंदूंचाही समावेश होता. मुस्लीम कुटुंबं गाव सोडून गेल्यानंतर मशिदीत कोणाच जाईना.  काही दिवसांनी हा दारुड्यांचा अड्डाच झाला होता. रात्रीच्या वेळी दारुडे येथे येऊन हुल्लडबाजी करीत. तेव्हा मी सुमारे 20 वर्षांचा होतो, असं अजय सांगतो.

दररोज आमच्या गावातील शंकराच्या मंदिराची साफसफाई होत असे. हनुमानाच्या मंदिरात दररोज लोक नमस्कार करायला यायचे. मात्र मुस्लिमांच्या धार्मिक जागा दारुड्यांचा अड्डा झाला होता. याबाबत अजयने लोकांशी चर्चा केली. गावांत मुस्लीम नसले तरी माणसं तर आहेत. हिंदू असलो म्हणून काय झालं? अल्ला पूजा करायला नकार देतील? आणि मी मशिदीची देखभाल करायला तयार झालो. याची सुरुवात मशिदीतील दारुड्यांचा बाहेर काढण्यापासून सुरुवात झाली. त्यानंतर मशिदीची साफसफाई केली.

यात बरेच दिवस गेले. दुसऱ्या गावातील मुस्लीम मित्रांच्या मदतीने मौलवींकडून अजाणचे रेकॉर्डिंग केले. हळूहळू नमाज पण शिकून घेतले. गेल्या दहा वर्षांपासून येथे दररोज पाच वेळा अजान आणि नमाज होते. अनेक हिंदूंनी मला अनेक प्रश्न विचारल्याचे अजय सांगतो. मात्र मी जरी नमाज पढत असतो तरी चालीसा विसरलो नाही. मंदिरात पण जातो, पूजा पाठ करीत असल्याचे तो सांगतो. सध्याची परिस्थिती पाहता हा आदर्शवत वाटतो. अनोख्या गावातील हा अनोखा अजूबा...

Published by: Suraj Yadav
First published: January 15, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading