माओवादांच्या अटकेविरोधात मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस

माओवादांच्या अटकेविरोधात मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस

देशाविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आलाय

  • Share this:

पुणे, ३० ऑगस्ट- ओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून करण्यात आलेल्या अटकसत्राविरोधात वेगवेगळ्या स्तरातून विरोध होतोय. राष्ट्रीय आणि राज्य मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकारला नोटीस धाडली असून ४ आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी या अटकसत्रादरम्यान निर्धारित कार्यपद्धतीचं आणि नियमांचं योग्य पालन केलं नसल्याचं आयोगानं या नोटीसीत म्हटलंय. तर तिकडे मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या ३७ संघटनांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आणि पुणे पोलिसांच्या कारवाईविरोधात टीका केली. तिकडे हैदराबादमध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली. अटकसत्राला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आलीय.

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून देशातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आलेल्या ५ आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी तूर्तास टळली आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होणार असून तोपर्यंत पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या आरोपींपैकी तिघाजणांविरोधात देशाविरूद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय.

ठाण्यातून अटक केलेला अरूण परेरा, हैदराबादमधून अटक करण्यात आलेले प्राध्यापक वरवरराव, छत्तीसगडमधून अटक करण्यात आलेल्या सुधा भारद्वाज यांना पुण्यातल्या  कोर्टात हजर करण्यात आलं. यातील सुधा भारद्वाज यांना ३० ऑगस्टपर्यंत नजर कैदेत ठेवण्यात येणार आहे. देशाविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप या सर्वांवर ठेवण्यात आलाय.

सुप्रीम कोर्टाच्या अटकेनंतर सर्व आरोपींना पोलीस घरी सोडत आहेत. वरवरा राव आज पहाटे हैदराबादच्या आपल्या राहत्या घरी दाखल झाले. तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात येईल, पण त्यांची चौकशी करता येणार नाही. घरी पोहोचल्यावर राव माध्यमांशी बोलण्यास इच्छुक होते, पण पोलिसांनी त्यांना मनाई केली.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या पाचही जणांविरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केलाय. पाचही आरोपी हे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित आहेत, एवढंच नव्हे तर माओवाद्यांनीच पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेला आर्थिक रसद पुरवली होती असा दावा देखील पुणे पोलिसांनी केलाय. पुणे पोलिसांनी काल देशभरात छापे मारून 5 संशयितांना अटक केलीय. त्या कारवाईची माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली.

Loading...

VIDEO : शिवराज सिंग 'बाहुबली' तर ज्योतिरादित्य 'भल्लादेव'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 07:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...