Home /News /national /

Asteroid 1998 OR2: थोड्याच वेळात पृथ्वीच्या जवळून जाणार एव्हरेस्ट एवढी मोठी उल्का, जाणून घ्या खास गोष्टी

Asteroid 1998 OR2: थोड्याच वेळात पृथ्वीच्या जवळून जाणार एव्हरेस्ट एवढी मोठी उल्का, जाणून घ्या खास गोष्टी

Asteroid 1998 OR2: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (NASA) ने काही दिवसांपूर्वी असा खुलासा केला होता की, एक उल्का किंवा लघूग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेनं येत आहे.

    नवी दिल्ली, 29 एप्रिल : एकीकडे कोरोनामुळं साऱ्या जगात थैमान घातले असताना दुसरीकडे आकाशात मात्र एक विलक्षण घटना थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. पृथ्वीच्या जवळून एव्हरेस्ट एवढा मोठा लघुग्रह जाणार आहे. नासाच्या मते या लघुग्रहाच्या नाव 1998 OR2 आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाईल. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे पृथ्वीपासून सुमारे 40 लाख मैलांच्या अंतरावर जाईल. हा उल्का एनईईटी नावाच्या कार्यक्रमांतर्गत हवाईयन बेटांवर सापडला. त्याचा वेग ताशी 19 हजार किलोमीटर आहे. त्याचे नवीन चित्र समोर आले आहे. ही एक ऐतिहासिक खगोलीय घटना असेल. यानंतर, हे लघुग्रह 2079 मध्ये येईल. किती मोठा आहे आकार? या विशाल उल्काचा अंदाजे व्यास 1.1 ते 2.5 मैल (1.8 ते 4.1 किलोमीटर) किंवा अमेरिकेतील मॅनहॅटन बेटाएवढा रुंद आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे ही उल्का तोंडावर मास्क घातल्यासारखी दिसत आहे. याचा आकार एव्हरेस्ट सारखाच असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या उल्काचा वेग हा 31,319 किलोमिटर प्रतितास इतका आहे. म्हणजे जवळपास 8.72 किलोमीटर प्रति सेंकद या वेगाने येत आहे. पृथ्वीला धोका? अर्थात, 29 एप्रिल रोजी, एक प्रचंड उल्का पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. नासाच्या मते, सुमारे 2 हजार फूट क्षेत्रासह जेओ 25 नावाचे एक उल्का भूमीपासून 1.8 दशलक्ष किमी अंतरावर जाईल. गेल्या 400 वर्षात किंवा येत्या 500 वर्षात इतक्या जवळून कोणताच उल्का गेला नाही आहे. नासाने असेही म्हटले आहे की, हा उल्का चंद्रापासून पृथ्वीपर्यंतचे अंतर 4 पट जास्त वाढेल. मात्र या हा उल्का पृथ्वीला स्पर्श करणार नाही आहे. 2013 मध्ये जवळपास 20 मिटर रूंद अशी एक उल्का पृथ्वीच्या कक्षेत आदळली होती. तर एक 40 मिटरची उल्का 1908 मध्ये सायबेरियाच्या कक्षेत आदळली होती. या उल्कापासून पृथ्वीवर कोणताही धोका असणार नाही. त्यामुळे, या अफवांवर विश्वास ठेवू नका. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Nasa

    पुढील बातम्या