नवऱ्यानं दिला तलाक; पीडितेनं धर्म बदलून हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे केलं लग्न

नवऱ्यानं दिला तलाक; पीडितेनं धर्म बदलून हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे केलं लग्न

नवऱ्यानं तलाक दिल्यानंतर पीडितेनं हिंदू धर्माचा स्वीकार केला. शिवाय, लग्न देखील केलं.

  • Share this:

पीलीभीत, 17 मे : तिहेरी तलाक पीडित पत्नीनं धर्म बदलून हिंदू रिती – रिवाजाप्रमाणे लग्न केल्याची घटना पीलीभीतमध्ये समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील महिलेला पतीनं तलाक दिला. त्यानंतर तिनं हिंदू धर्माचा स्वीकार करत हिंदू रिती- रिवाजाप्रमाणे लग्न केलं. यानंतर महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. या पार्श्वभिमवर महिलेच्या पतीच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

प्रेमाच्या जाळ्यात अडकवत 30 पेक्षा अधिक महिला, तरुणींवर बलात्कार

काय आहे घटना?

पीलीभीत शहरामध्ये देशनगर भागात मोहम्मद इस्लामची मुलगी रेश्मा राहते. 3 वर्षापूर्वी तिचं लग्न मोहम्मद रईससोबत झाली होती. काही दिवसानंतर पती – पत्नीमध्ये वाद झाले. मोहम्मद रईसनं रेश्माला त्रास द्यायला सुरूवात केली. शिवाय, मारहाण देखील केली. त्यानंतर 5 एप्रिल 2019 रोजी मोहम्मद रईसनं रेश्माला तलाक दिला. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला.

याकाळात रेश्माची ओळख कांशीराम कॉलनीतील दिपक राठोडसोबत झाली. दोघांमधील भेटी- गाठींमध्ये वाढ झाली. या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. गोष्ट अगदी लग्नापर्यंत आली. त्यानंतर रेश्मानं हिंदू धर्माचा स्वीकार करत बुधवारी दिपक राठोडसोबत लग्न केलं. लग्नानंतर रेश्मानं आपलं नाव बदललं असून ते राणी ठेवलं आहे. पण, सध्या दोघांना धमक्या दिल्या जात आहेत.

दोघंही वेगवेगळ्या धर्मातील असल्यानं त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं दिपकनं सांगितलं. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी रेश्मा गरज असताना दिपकनं आधार दिल्याची माहिती दिली.

दिपक राठोडचे वडील रिक्षा चालवतात. मागील 30 वर्षांपासून राठोड परिवार हा पीलीभीतमध्ये राहत आहे.

VIDEO: मराठा विद्यार्थ्यांना दिलासा, आरक्षणप्रकरणी सरकारचा मोठा निर्णय

Tags: talaq
First Published: May 17, 2019 02:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading