बारावीत अपयश आलंय? हिंमत हारू नका, या लोकांचा आदर्श घ्या!

बारावीत अपयश आलं असेल तर खचून जाऊ नका. जगात अनेक लोकांनी नापास झाल्यानंतर पुन्हा अभ्यास करून यश मिळवलं.

  • Share this:

राष्ट्रपिता महात्मा गांधीसुद्धा एकदा नापास झाले होते. लॅटीन आणि फ्रेंच भाषा शिकत असताना लॅटीन भाषेत ते नापास झाले होते. त्यावेळी निराश न होता अभ्यास करून दुसऱ्या वेळी पास झाले. 'माझे सत्याचे प्रयोग' या पुस्तकात गांधीजींच्या नापास होण्याची कथा आहे.

गांधीजींप्रमाणेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींनासुद्धा लॅटीनने दगा दिला होता. इतिहास आणि राजकारणात चांगले मार्क्स मिळूनही त्यांना लॅटीन भाषेत उत्तीर्ण होता न आल्यानं ऑक्सफर्ड़ युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला नव्हता. त्यांनी दुसऱ्यांदा परिक्षा देऊन प्रवेश मिळवला होता.

अल्बर्ट आइनस्टाइन यांनाही अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणाऱ्या अल्बर्ट आइनस्टाइन यांना 1921 ला भौतिकशास्त्रातील नोबेलनं गौरवण्यात आलं होतं. वयाच्या सतराव्या वर्षी ते कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत गणित आणि विज्ञान वगळता अन्य सर्व विषयांत नापास झाले होते. त्यांचा जन्मदिन जगभरात ‘जीनियस डे’ म्हणून साजरा केला जातो.

महान भारतीय गणितज्ज्ञ रामानुजन हेसुद्धा नापास झाले होते. गणिताकडे ओढा असलेल्या रामानुज यांचं इतर विषयांकडे दुर्लक्ष व्हायचं. यामुळे ते परीक्षेत अपयशी वेडापायी अन्य विषयांमध्ये दुर्लक्ष झाल्याने परीक्षेत अपयशी ठरत होते.

कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्जने ऑडिटिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. पण पहिल्याच सत्र परीक्षेत नापास झाल्याने कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर स्टीव्ह जॉब्जने जग बदलून टाकणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मीती केली.

मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हेसुद्धा महाविद्यालयात शिक्षण घेत नापास झाले होते. क्रिकेटचं वेड, नाटकाची आणि लेखनाची आवड यामुळे कुसुमाग्रज गणितात नापास झाले पण त्यांनी निराश न होता पुन्हा अभ्यास करुन विषय सोडवला होता.

कादंबरीकार ना.सी फडके यांच्या माझं बालपण पुस्तकात नापास होण्याची गोष्ट लिहिली आहे. त्यात शंभरपैकी शून्य मार्क या लेखात त्यांनी सांगितलं आहे. वडील मामलेदार होते त्यामुळे अनेक गावात बदली व्हायची आणि ना. सी. फडकेंची शिक्षणातली गोडी कमी झाली होती. गणितात शंभरपैकी शून्य गुण मिळाले होते. तेव्हा अधिक अभ्यास करून हुशार विद्यार्थी म्हणून ओळख मिळवली.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे न्यायालयात काम करत करत शिक्षण घेत होते. त्यावेळी नाइट स्कूलमध्ये असताना नाटकात काम करण्याच्या आवडीने त्यांच्यावर तीनवेळा एसएससीत नापास होण्याची वेळ आली होती. पण त्यांनी शिक्षण थांबवलं नाही. पास झाल्यानंतर पुढे पोलिसात नोकरी मिळाली. त्यानंतर वकिलीचं शिक्षणही पूर्ण केलं. राजकारणात आल्यानंतर शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि केंद्रातही त्यांनी मंत्रीपद भूषवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2019 05:54 PM IST

ताज्या बातम्या