नवी दिल्ली, 20 एप्रिल : हिमाचल प्रदेश बोर्ड ऑफ सेकंड्री एज्येुकेशन HPBOSE बारावीचा निकाल आपली ऑफिशिअल वेबसाईट hpbose.org वर घोषित करेल. यापूर्वी हिमाचल प्रदेश बोर्ड 22 एप्रिल या दिवशी निकाल घोषित करेल अशी शक्यता होती. पण, आता 20 एप्रिलला हा निकाल जाहीर केला जाणार आहे. hpbose.org या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. हिमाचल प्रदेश बोर्ड HPBOSEनं जवळपास 8000 शाळांना मान्यता दिली आहे.
कुठे पाहाल निकाल?
1. hpbose.org
2. examresults.net
3. indiaresults.com या ठिकाणी तुम्ही नकाल पाहू शकता.
ऑनलाईन कसा चेक कराल HPBOSE बारावीचा निकाल
- सर्वप्रथम hpbose.org या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर रिझल्टवरती क्लिक करा.
- तुमचं नाव आणि परिक्षा क्रमांक टाका.
- त्यानंतर 'Search Result' वर क्लिक करा.
- 'Search Result' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल.
- त्यानंतर तुम्ही रिझल्ट डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घेऊ शकता
एसएमएस द्वारे कसा मिळवाल निकाल
विद्यार्थी मेसेजद्वारे देखील आपल्या रिझल्टची माहिती करून घेऊ शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना 'HP12 तुमचा परिक्षा क्रमांक' लिहून 56263 पाठवावा लागेल. त्यानंतर मेसेजद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कळू शकेल.
हिमाचल प्रदेश बोर्डानं मार्चमध्ये बारावीची परिक्षा घेतली होती. 20 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान ही परिक्षा पार पडली होती. बारावीच्या आर्टस, कॉमर्स आणि सायन्ससाठी ही परिक्षा घेण्यात आली होती. शारिरीक शिक्षण, योगा आणि अकाऊंटन्सीची सराव परिक्षा 20 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान घेण्यात आली होती.
2018मध्ये बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये लागला होता. त्यामुळे 2019चा विचार करता यंदा मात्र निकाल लवकर लागला आहे. 2018मध्ये एक लाख विद्यार्थ्यी परिक्षेला बसले होते.
VIDEO: सत्तार झाले आता विखेंचा नंबर? काय म्हणाले अशोक चव्हाण