पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना, असा आहे 7 दिवसांचा कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना, असा आहे 7 दिवसांचा कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. रविवारी रात्री (22 सप्टेंबर)टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये 'हाउडी मोदी' (Howdy Modi) कार्यक्रमास ते संबोधित करणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. रविवारी रात्री (22 सप्टेंबर)टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये 'हाउडी मोदी' (Howdy Modi) कार्यक्रमास ते संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ह्युस्टनच्या NRG स्टेडिअममध्ये 'टेक्सास इंडिया फोरम'तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी 5 हजारहून अधिक लोकांना संबोधित करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा

21 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वेळेनुसार सकाळी 11.05 मिनिटांनी जॉर्ज बुश इंटरनॅशनल एअरपोर्ट ह्यूस्टन येथे पोहोचतील.

22 सप्टेंबर : भारतीय वेळेनुसार पंतप्रधान मोदी पहाटे 4.30 वाजता (स्थानिक वेळ संध्याकाळी 6 वाजता) हॉटेल पोस्ट ओक येथे तेल कंपन्यांच्या सीईओंची भेट घेणार आहेत.

- भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता (स्थानिक वेळ संध्याकाळी 7.35 वाजता)PIO आणि NIRसोबत भेट घेतील.

23 सप्टेंबर : पंतप्रधान मोदी क्लायमेट समिटला संबोधित करतील.

-दहशतवाद मुद्यासंदर्भात जगभरातील नेत्यांची भेट घेतील.

-अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधींसोबत भेट

(वाचा : पंतप्रधान मोदींच्या राम मंदिरावरील 'त्या' विधानावरून उद्धव ठाकरेंचा पलटवार)

24 सप्टेंबर : UNSG तर्फे आयोजित भोजन कार्यक्रमात सहभाग

- महात्मा गांधी यांच्या 150 जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील.

- गेट्स फाउंडेशनतर्फे ग्लोबल गोलकीपर पुरस्कारनं होणार सन्मान

- ब्लूमबर्गच्या सीईओसोबत भेट

25 सप्टेंबर : CARICOMची बैठक, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 20 नेत्यांसोबत भेट होण्याची शक्यता

27 सप्टेंबर : यूएनजीए सेशनला करणार संबोधित

(वाचा : आदित्य ठाकरे, फडणवीसांविरोधात काँग्रेसची रणनीती, प्रियांकाही उतरणार मैदानात?)

मोदींच्या कार्यक्रमाची जय्यती तयारी

अमेरिकेतील ज्या स्टेडिअमवर पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करणार आहेत, तेथे सध्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. भल्यामोठ्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी   भव्यदिव्य सभेला संबोधित करणार आहेत. मोदींच्या भाषणापूर्वी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जाणार आहे. केवळ डोनाल्ड ट्रम्पच नाही तर अमेरिकेचे कित्येक खासदारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या रविवारी होणाऱ्या कार्यक्रमास 'हाउडी मोदी' असं नाव देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये दणदणीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.

(वाचा : पंतप्रधान मोदींचे आरोप खरे निघाले तर राजकारण सोडू, राष्ट्रवादीचा पलटवार)

VIDEO: दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 09:51 AM IST

ताज्या बातम्या