Howdy Modi : शरिरात 100 फ्रॅक्चर तरी PM मोदींसमोर आज गाणार राष्ट्रगीत!

Howdy Modi : शरिरात 100 फ्रॅक्चर तरी PM मोदींसमोर आज गाणार राष्ट्रगीत!

Howdy Modi : ह्यूस्टनमधील भारतीय अमेरिकी नागरिकांनी पंतप्रधान मोदींसाठी 'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे.

  • Share this:

ह्यूस्टन, 22 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर संपूर्ण जगाचं लक्ष आहे. लोकसभा निवडणूक 2019मध्ये घवघवीत यश मिळवत नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. जगभरातील सर्वांच्या नजरा या 'हाउडी मोदी' (Howdy Modi) या महत्त्वपूर्ण कार्यक्रमावर असणार आहे. ह्यूस्टन येथील एनआरजी फुटबॉल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार 8.30वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन खास पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी करण्यात आले आहे. 'हाउडी मोदी' हा कार्यक्रम तीन तासांचा असणार आहे. या कार्यक्रमास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील हजर राहणार आहेत. तब्बल 30 मिनिटांचं भाषण देखील ते देणार आहेत. अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्ष श्रृंगला यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा शुक्रवारी आढावा घेतला. दरम्यान, या कार्यक्रमात 16 वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा मोदींसमोर राष्ट्रगीत गाणार आहे.

स्पर्श शाह हा भारतीय वंशाचा मुलगा मोदींसमोर हाउडी मोदी या कार्यक्रमात राष्ट्रगीत गाणार आहे. मुख्य म्हणजे स्पर्षला ऑस्टियोजेन्सिस इॅपरफेक्टा नावाचा आजार आहे. स्पर्श मोदींना भेटण्यासाठी उत्सुक असून, तो फक्त एक चांगला गायक नाही तर एक मोटिवेशनल स्पीकर आहे. आहे. स्पर्श अमेरिकेतील न्यूजर्सी येथे स्थायिक आहे.

वाचा-लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत 'Howdy Modi'चीच चर्चा, काय आहे शब्दाचा अर्थ?

गेल्या काही वर्षांत स्पर्शची तब्बल 130 हाडं तुटली आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, स्पर्श जेव्हा आपल्या आईच्या पोटात होता, तेव्हाच त्याच्या शरिरातील 35 हाडं तुटली होती. त्यामुळं स्पर्श चालू शकत नाही. त्याला व्हिलचेअरवरूनच फिरावे लागते. 2018मध्ये स्पर्शच्या जीवनावर आधारित ‘ब्रिटल बोन रॅपर’ नावाची डॉक्युमेंट्री प्रदर्शित करण्यात आली होती.

वाचा-PM मोदींचं गृहराज्य झालं भ्रष्टाचाराचा अड्डा! 5 वर्षात 40 हजार तक्रारी दाखल

पंतप्रधान मोदींसाठी मेगा इव्हेंटचं आयोजन

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू आहे. 1000 हून अधिक व्हॉलिंटिअर्स (स्वयंसेवक)या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तब्बल 5 हजारहून अधिक नागरिकांनी नावनोंदणी केली आहे. विशेष म्हणजे पोप यांच्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या परदेशी नेत्याच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळणार आहे. मोदींच्या भाषणापूर्वी येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जाणार आहे. केवळ डोनाल्ड ट्रम्पच नाही तर अमेरिकेचे कित्येक खासदारही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

वाचा-महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस येणार!शाहांकडून मोठी घोषणा

मोदींना भेटण्यासाठी उत्सुक आहे स्पर्श

मोदींना भेटण्याबाबत स्पर्शनं, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी उत्सुक आहे. माझ्यासाठी ही खुप मोठी गोष्ट आहे की मला एवढ्या लोकांसमोर राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली आहे”, असे सांगितले.

'शरद पवारांचा कलम 370 हटवण्यास विरोध', अमित शाह म्हणतात...पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 04:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading