Aadhaar : नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलण्यासाठी 'ही' कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या प्रक्रिया

Aadhaar : नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलण्यासाठी 'ही' कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या प्रक्रिया

Aadhar Card हरवलंय का? नाव किंवा पत्ता यातलं काही चुकलं आहे का? अपडेट करायचं आहे? किती खर्च येईल? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

  • Share this:

मुंबई, 13 सप्टेंबर : तुमच्या आधार कार्डवर नाव, पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची पडली असेल किंवा तुम्ही पत्ता बदलला असेल तर तो अपडेट करणं गरजेचं आहे. कारण आधार भारतीयांसाठी महत्त्वाचे असून त्यात लहानशी चूक मोठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते. चुकीची माहिती तशीच राहिली तर इतर ठिकाणीसुद्धा तशीच अपडेट होईल.

आधार कार्डवरची माहिती अपडेट करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे याची यादी UIDAI ने शेअर केली आहे. यात जवळपास 103 कागदपत्रं आहेत. तुमच्याकडं यातील उपलब्ध असलेली कागदपत्रांच्या आधारे आधार अपडेट करता येतील.

नाव बदलण्यासाठी 31 कागदपत्रे ग्राह्य धरली जातात. यामध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, शिधापत्रिका, पीडीएस फोटो कार्ड, मतदान ओळख पत्र, वाहन चालवण्याचा परवाना सरकारी फोटो ओळख पत्र यांचा समावेश आहे. तसेच एनआरआयजीएस जॉब कार्ड, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचं ओळखपत्र, शस्त्र परवाना, स्वातंत्र्यसैनिक फोटो कार्ड, किसान फोटो पासबूक, CGHS / ECHS फोटो कार्ड, राजपत्रित जाहीर केलेल्या फोटोसह ओळखीच्या प्रमाणपत्राचे लेटरहेड, दिव्यांग ओळखपत्र, खासदारांद्वारे देण्यात आलेलं ओळखीचं प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचे ओळख पत्र, नाव बदलल्याची अधिसूचना असलेलं गॅझेट, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, RSBY कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, बँक पासबूक ज्यावर नाव आणि फोटो असेल.

जन्म तारखेत बदल करायचा असेल तर जन्माचा दाखला, एसएसएलसी बुक / सर्टिफिकेट, पासपोर्टस पॅन कार्ड, माध्यमिक उच्च माध्यमिक बोर्डाचं गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला,

वाचा : तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचंय का? आता मोजावी लागेल एवढी फी

पत्ता बदलण्यासाठी पासपोर्ट, बँक स्टेटमेंट / पासबुक, पोस्ट ऑफिसच्या अकाउंटचे स्टेटमेंट किंवा पासबुक, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, वीज बिल, पाणी बिल, वीज बिल (अलिकडच्या 3 महिन्यातील) यापैकी कोणतीही कागदपत्रं पत्ता बदलण्यासाठी चालतात. याशिवाय विमा पॉलिसी, NREGS जॉब कार्ड, पेन्शनर कार्ड, स्वातंत्र्यसैनिक कार्ड, किसान पासबुक, CGHS / ECHS कार्ड, वाहन नोंदणी प्रमाणपत्र,

पती-पत्नीचा पासपोर्ट, लहान मुलं असतील तर त्यांच्या आई वडिलांचा पासपोर्ट, शाळेचं ओळखपत्र, नाव आणि पत्ता यांचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला याशिवाय इतर काही कागदपत्रेसुद्धा पत्ता बदलण्यासाठी ग्राह्य धरली जातात.

वाचा : अत्यंत महत्त्वाची आहे Aadhaarची 'ही' पावती, हरवल्यास तुमचं वाढणार टेन्शन

आधार कार्ड हरवलं तर...

तुमचं आधार कार्ड जरी हरवल असेल तरीही नोंदणी क्रमांकाच्या आधारे UIDAIच्या संकेतस्थळाला भेट देऊन आधार कार्डचं प्रिंट घेऊ शकता. एखाद्या व्यक्तीला आपल्या आधार कार्डवरील क्रमांक माहिती नसल्यास यावेळेस ईआयडी तुमचं टेन्शन कमी करतं. ईआयडीच्याच मदतीनं तुम्ही आपलं नवीन आधार कार्ड मिळवू शकता. कार्डच्या नावनोंदणी पावतीवरील 14-14 आकड्यांच्या बेरजेतून तुम्हाला ईआयडी उपलब्ध होता.

वाचा : आधार अपडेट करायचंय? 'अशी' आहे सोपी पद्धत

आधार कार्डात बदल करायचा असेल तर 'अशी' घ्या ऑनलाइन अपाॅइंटमेंट

VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

Published by: Suraj Yadav
First published: September 13, 2019, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading