अशा पद्धतीने तुम्हीही साधू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद

तुमच्याकडे एखादी चांगली सूचना असेल किंवा तुम्हाला एखादा मुद्दा पंतप्रधानांपर्यंत पोहोचावयचा असेल तर त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. पंतप्रधान कार्यालय तुमच्या सूचनांची दखल घेईल. तुमची एखादी संकल्पना देशाच्या विकासासाठी उपयोगी पडू शकते.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 07:52 PM IST

अशा पद्धतीने तुम्हीही साधू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद

नवी दिल्ली, 7 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत असतात. आपला मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक आणि ट्विटर यासारखी माध्यमंही आहेत. पण त्याशिवाय आणखी काही मार्गांनी तुम्हीही पंतप्रधानापर्यंत पोहोचू शकता.

पंतप्रधान कार्यालयामार्फत दररोज सोशल मीडियाच्या अहवालानुसार ट्विटरसाठीच्या कॉमेंट्सची एक यादी बनवली जाते. ही यादी पंतप्रधान मोदींशी शेअर केली जाते. तुम्ही @PMOIndia किंवा @Narendramodi या अकाउंटवर तुमचं म्हणणं तुम्ही मांडू शकता. त्याशिवाय तुम्ही इन्स्टाग्रामवर https://www.instagram.com/narendramodi/ आणि लिंक्ड इन वर https://in.linkedin.com/in/narendramodi इथे संपर्क साधू शकता.

तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचावयची असेल तर www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ या लिंकवर लॉग इन करू शकता. पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी एक अधिकृत पोर्टल डिझाइन करण्यात आलं आहे. या पोर्टलवरही तुम्ही तुमची समस्या मांडू शकता.

अशी मांडा तुमची कल्पना

पंतप्रधान कार्यालय दररोज एक अहवाल तयार करतं. या अहवालात नरेंद्र मोदींशी संबंधित पत्रं आणि ट्वीट्सचा आढावा घेतलेला असतो. तुम्ही www.mygov.in यावर जाऊनही तुमच्या सूचना नोंदवू शकता. तुमची एखादी कल्पना पंतप्रधान कार्यालयाने उचलून धरली तर ती देशाचं चित्र बदलण्यासाठीही उपयोगी पडू शकते.

Loading...

यू ट्यूब वरूनही साधू शकता संवाद

तुम्ही यू ट्यूबवर Narendra modi's Youtube Channel सबस्क्राइब करून त्यावरही तुमचा संदेश लिहू शकता. narendramodi1234@gmail.com या इ मेल च्या माध्यमातूनही तुम्ही पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचू शकता. मोबाइलवर NaMo अॅप डाउनलोड करूनही तुम्ही तुमचं म्हणणं त्याद्वारे मांडू शकता.

नाहीतर पाठवा पत्र

एवढया सगळ्या तांत्रिक माध्यमांच्या द्वारे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं नसेल तर पत्र पाठवण्याचाही पर्याय आहे. त्यासाठीचा पत्ता आहे, सन्माननीय पंतप्रधान, भारत सरकार, 7 रेसकोर्स रोड, नवी दिल्ली.

=================================================================================================

VIDEO : आयारामांची आमच्याकडे लाईन, गिरीश महाजनांचा चव्हाणांवर पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...