News18 Lokmat

सायबर हल्ला झाल्यास काय कराल?

अशा प्रकारचे आणखी सायबर हल्ले होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून सुरक्षा यंत्रणांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 15, 2017 02:45 PM IST

सायबर हल्ला झाल्यास काय कराल?

15 मे : जगभरात 'वॉन्नाक्राय' या रॅनसमवेअरचा धुमाकूळ सुरूच असून, आज (सोमवारी) अशा प्रकारचे आणखी सायबर हल्ले होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

गेल्या दहा वर्षांतील हा सर्वांत मोठा सायबर हल्ला असल्याचं संगितलं जात आहे. या सायबर हल्ल्यासाठी रॅनसमवेअर नावाच्या व्हायरसचा वापर केला आहे.  रॅनसमवेअर हा एक असा व्हायरस आहे की जो तुमच्या कम्प्युटर्स फाइल डिलीट करण्याची धमकी देतो. या व्हायरसचा फायदा घेत हल्लेखोरांनी डेटा परत देण्यासाठी पैशांचीही मागणी केली आहे.

युरोप, अमेरिकेला या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसला असला तरी, आशिया खंडात या सायबर हल्ल्याचा अजूनपर्यंत अंत्यत वाईट परिणाम दिसून आलेला नाही. पण सोमवारी सकाळी कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर या व्हायरसच्या व्याप्तीबद्दल अजून माहिती मिळेल, असं एका सायबर सुरक्षा तज्ञांने सांगितलं आहे.

सायबर हल्ल्याचा काय परिणाम ?

- लाखो कॉम्प्युटर हॅक

Loading...

- कॉम्प्युटरमधल्या डेटाची चोरी

- हॅकर्सकडून संस्था आणि लोकांकडे खंडणीची मागणी

- ब्रिटनची आरोग्य व्यवस्था कोलमडली

- अफ्रिकन देशांमधील नेटवर्क आणि रेल्वेसेवा कोलमडली

- बँकांच्या नेटवर्कवरही परिणाम, पैसे काढता येईनात

- शॉपिंग वेबसाईटवर सेव्ह असलेले डिटेल्स चोरीला

सायबर हल्ला झाल्यास काय उपाययोजना कराव्यात?

- अनोळख्या व्यक्तीकडून आलेले मेल तसंच लिंक, अटॅच फाईल उघडू नये

- अविश्वासनीय वेबसाईट्सवरून चित्रपट, गाणी, फाईल्स डाऊनलोड करू नये

- सीडी, युएसबी आयटी व्हेरीफाईड कॉम्युटरलाच जोडा

- ओपन वायफाय किंव्हा हॉटस्पॉटला मोबाईल, लॅपटॉप, कॉम्युटर जोडू नका

- हॅकर्स या ओपन वायफाय किंवा हॉटस्पॉटचा वापर करून माहिती चोरू शकतात

- अपडेटेड अँटीव्हायरसच वापरा

- कोणताही अॅलर्ट आल्यास त्याबाबतची माहिती आयटी तज्ज्ञांना द्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2017 02:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...