मराठी बातम्या /बातम्या /देश /

Gift Auction of PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात सहभागी कसं व्हायचं?

Gift Auction of PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावात सहभागी कसं व्हायचं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होण्याचं हे चौथं वर्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होण्याचं हे चौथं वर्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होण्याचं हे चौथं वर्ष आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दरवर्षी हजारो वस्तू भेट म्हणून मिळतात. या वस्तू मौल्यवान असतात. त्या वस्तूंचा दर वर्षी लिलाव करण्यात येतो. या लिलावातून मिळणारी रक्कम एखाद्या विशेष कार्यासाठी वापरली जाते. यंदाही पंतप्रधानांच्या वाढदिवशी या भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होईल. त्यात कोणकोणत्या वस्तू असतील, त्यांची बेस प्राइस काय असेल व त्यासाठीची वेबसाइट कोणती याबाबत माहिती घेऊ या. 'आज तक'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होण्याचं हे चौथं वर्ष आहे. यंदा या लिलावात 1222 वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंची बेस प्राइस ठरवून घेतली जाते. त्यापुढे त्या वस्तूंवर बोली लावून त्यांचा लिलाव केला जातो. पंतप्रधानांच्या वाढदिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला हा लिलाव सुरू होईल व तो 2 ऑक्टोबरपर्यंत चालेल. या लिलावात पंतप्रधानांना विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी दिलेल्या, संस्थांनी दिलेल्या भेटवस्तू आहेत.

कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक स्पर्धांमधल्या खेळाडूंनी दिलेल्या भेटवस्तूही यात आहेत. मधुबनी पेंटिंगपासून ते चेन्नईतल्या बुद्धिबळ स्पर्धेत देण्यात आलेले बुद्धिबळाचे पटही यात भेटवस्तूंमध्ये आहेत. या लिलावातून उभी राहिलेली रक्कम ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला दिली जाणार आहे. गंगा नदीचं प्रदूषण कमी करून नदीची स्वच्छता व संवर्धन करण्यासाठी मोदी सरकारनं 2014मध्ये या प्रकल्पाला सुरुवात केली आहे.

पॅरालिम्पिक व कॉमनवेल्थ खेळांमध्ये पदकविजेत्या खेळाडूंनी दिलेल्या भेटवस्तू यंदाच्या लिलावात आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधानांना दिलेली राणी कमलापती यांची मूर्तीही या लिलावात असणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली हनुमानाची मूर्ती व हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडून मिळालेला त्रिशूळ यांचाही लिलाव केला जाईल. गेल्या वर्षी या लिलावात 1300 हून अधिक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. त्यांच्या लिलावातून सांस्कृतिक मंत्रालयाला 16 कोटी रुपये मिळाले होते.

हेही वाचा - PM Modi Birthday : बुटापासून पेनपर्यंत 'या' आहेत पंतप्रधान मोदींच्या आवडत्या गोष्टी

यंदाच्या या लिलावात 100 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत बेस प्राइस असलेल्या वस्तू आहेत. एकूण बेस प्राईसचा विचार केला, तर यंदा अडीच कोटी रुपयांच्या भेटवस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय खेळाडू, राजकीय व्यक्ती, नेतेमंडळी यांच्याकडून मिळालेल्या भेटवस्तू यात आहेत. Pmmementos.gov.in या वेबसाइटवर या भेटवस्तूंची किंमत व या लिलावासंबंधी अधिक माहिती उपलब्ध आहे. या वेबसाइटवर या वस्तू पाहता येतील व त्यांची खरेदीही करता येईल.

First published:

Tags: Narendra modi, PM Modi birthday, PM narendra modi