कसं जोडाल मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड?

कसं जोडाल मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड?

केंद्र सरकारने मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देऊ केली आहे.

  • Share this:

06 जानेवारी : केंद्र सरकारने मोबाइल क्रमांकाला आधार कार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देऊ केली आहे. त्यासाठी आता फारशी उठाठेव करण्याची गरज राहिलेली नाही. आता मोबाइलला 'आधार' जोडण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबर वरून 14546 या विशिष्ट क्रमांकावर कॉल करण्याची गरज आहे.त्यावर दिलेल्या सूचनांचं पालन केल्यास अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईलला आधार क्रमांक जोडला जाऊ शकतो.

मोबाईलला आधार कार्ड जोडणं होणार​ सोपं

1.आधार क्रमांक मोबाईलला जोडण्यासाठी तुमच्या फोनवरून १४५४६ हा क्रमांक डायल करा

२. योग्य त्या पर्यायाची निवड केल्यानंतर तुमचे नागरिकत्व विचारलं जाईल .

३. त्यानंतर फोनच्या किपॅडवरून १ क्रमांक दाबून मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याची परवानगी द्या.

४. त्यानंतर बारा अंकी आधार क्रमांक टाकून त्यापुढे निश्चित करण्यासाठी १ दाबा.

५. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येईल. तो स्क्रीनवर टाइप करा.

६. त्यानंतर मोबाईल ऑपरेटर तुमची मंजुरी घेऊन तुमच्या आधार कार्डवरून तुमचे नाव, फोटो आणि जन्मतारीख आदी माहितीची खातरजमा करतो.

७. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकाची खात्री करण्यासाठी आयव्हीआर मोबाइल क्रमांकाचे शेवटचे चार क्रमांकांची मागणी करतो.

८. जर, तुमचा क्रमांक योग्य असेल तर एसएमएसद्वारे ओटीपी पाठवला जातो.

९. आता १ क्रमांक दाबून आधार आणि मोबाईल क्रमांकाच्या पुनर्पडताळणीची खात्री करा.

१०. जर तुमच्याकडे दोन मोबाईल क्रमांक असतील तर, दोन्ही क्रमांक टाइप करा. त्यानंतर आयव्हीआरकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2018 10:58 AM IST

ताज्या बातम्या