नवी दिल्ली, 14 जून : रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार राज्यात राहणाऱ्या गरीब-मध्यमवर्गीय कुटुंबांना रेशन पुरवत असते. केवळ रेशनकार्डच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिलं जातं. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणूनही रेशन कार्डचा (Ration card) वापरही केला जातो. उदाहरणार्थ एलपीजी कनेक्शन घेणे, ड्रायव्हिंग लायसन्स इत्याही कामांमध्ये हे पत्त्याचा पुरावा म्हणून देखील मानले जाते. रेशन कार्डवर कुटुंबातील सगळ्यांची नावे असतात. मात्र, आपल्याला अनेकदा रेशन कार्डवरील (Ration card update process) नाव कमी करावे लागत असते किंवा नवीन नाव जोडावे लागते.
एखाद्या नवीन व्यक्तीचा आपल्या कुटुंबात समावेश झाला असेल, जसे की कुटुंबात मूल जन्माला आले असेल किंवा एखादी नवीन सून लग्न होऊन आली असेल तर आपण त्यांचे नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकता, यासाठी आपण या सोप्या पद्धतींचा अवलंब करून हे काम आरामात करू शकता.
अशी करा प्रोसेस
रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला त्याच्या आधार कार्डमध्ये सुधारणा (अपडेट) करावी लागेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या मुलीने लग्नानंतर आपले आडनाव बदलले तर तिला तिच्या वडिलांच्या ऐवजी आधार कार्डमध्ये पतीचे नाव भरावे लागेल आणि नवीन पत्ता अपडेट करावा लागेल. यानंतर नवीन आधारकार्डचा तपशील पतीच्या क्षेत्रात उपस्थित अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावा लागेल.
हे वाचा - खूशखबर! ही बँक त्यांच्या ग्राहकांना देत आहे मोफत रेशन, वाचा कुणाला मिळतोय लाभ?
दुसऱ्या पद्धतीनं आपल्याला हवे असल्यास ऑनलाइन व्हेरिफिकेशननंतरही आपण नवीन सदस्याचे नाव जोडू शकता. यामध्ये जुन्या रेशनकार्डमधील नाव हटवून तुम्हाला नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज करावा लागेल. या सर्व प्रोसेससाठी आपला नंबर नोंदविला जाणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला राज्याच्या अन्नपुरवठ्याच्या अधिकृत साइटवर जावं लागेल.
काही कागदपत्रांची आवश्यकता आहे
नवीन मुलाचे नाव जोडण्यासाठी कुटुंब प्रमुखांचे रेशन कार्ड (छायाप्रती आणि मूळ दोन्ही), मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि मुलाच्या आई-वडिलांचे दोघांचेही आधार कार्ड आवश्यक असेल.
सूनेचे नाव जोडण्यासाठी तिच्या माहेरील रेशन कार्डवरील नाव काढल्याचे प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र (marriage certificate), पतीचे रेशनकार्ड (झेरॉक्स आणि मूळ दोन्ही) आणि सूनेचे आधार कार्ड असावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ration card