मुंबई, 13मार्च : क्रिकेटर आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना पुलवामा हल्ल्यानंतर जबरदस्त ट्रोल करण्यात आलं. या हल्ल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून त्यांना कपिल शर्माच्या शोमधून काढून टाकण्यात आलं.
असं असलं तरी कपिल शर्माच्या शो मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांचा उल्लेख करण्यासाठी या शो च्या कलाकारांनी एक नामी शक्कल लढवली. ही संधी त्यांना मिळाली ती क्रिकेटर्सच्या शो मध्येच.
1983 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमच्या खेळाडूंना या शो मध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी सगळ्या खेळाडूंची ओळख करून दिली कॉमेडियन किकु शारदा यांनी.
रविवारच्या या एपिसोडमध्ये कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, कृष्णम्माचारी श्रीकांत, रॉजर बिनी, कीर्ती आझाद, मदन लाल, सय्यद किरमाणी, बलविंदर संधु, यशपाल शर्मा आणि सुनील वाल्सो हे सगळे जण आले होते.
या सगळ्यांसोबत कपिल शर्मा आणि त्याच्या सहकलाकारांनी खूप धम्माल केली. या शो मध्ये त्यांनी सिद्धूच्या जागी हरभजन सिंगला बसवलं होतं.त्यानंतर किकु शारदा या कलाकाराने सगळ्या खेळाडूंचे आभार मानले. त्यानंतर हरभजन सिंगकडे बघून ते म्हणाले, या दिग्गज खेळाडूंसमोर सिद्धूजी खूपच लहान वाटतायत !
त्यावर कपिल शर्मा म्हणाला, अरे, हे सिद्धू पाजी नाहीत, हे भज्जी आहेत !
नवज्योतसिंग सिद्धू शो मध्ये नसतानासुद्धा त्यांच्यावरच्या एका काॅमेंटमुळे 'कपिल शर्मा शो' च्या हिट्स वाढल्या आहेत. किकु शारदाच्या या फटकेबाजीचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.
नवज्योतसिंग सिद्धू शोबाहेर असले तरी त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही हेच यावरून दिसलं.
======================================================================================