मराठी बातम्या /बातम्या /देश /बिहारमध्येही तयार होते 'शिंदे,' 'शिवसेना' व्हायची भीती ओळखून नितीशनी सोडली भाजपची साथ!

बिहारमध्येही तयार होते 'शिंदे,' 'शिवसेना' व्हायची भीती ओळखून नितीशनी सोडली भाजपची साथ!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar Resigns) यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा भाजपची (BJP) साथ सोडली आहे. जेडीयूची (JDU) अवस्थाही शिवसेनेसारखी (Shivsena) होऊ शकते हे संकेत मिळताच नितीश कुमार यांनी हे पाऊल उचललं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar Resigns) यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा भाजपची (BJP) साथ सोडली आहे. जेडीयूची (JDU) अवस्थाही शिवसेनेसारखी (Shivsena) होऊ शकते हे संकेत मिळताच नितीश कुमार यांनी हे पाऊल उचललं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar Resigns) यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा भाजपची (BJP) साथ सोडली आहे. जेडीयूची (JDU) अवस्थाही शिवसेनेसारखी (Shivsena) होऊ शकते हे संकेत मिळताच नितीश कुमार यांनी हे पाऊल उचललं आहे.

पटणा, 9 ऑगस्ट : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar Resigns) यांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा भाजपची साथ सोडली आहे. यावेळची जेडीयू (JDU) आणि भाजप (BJP) यांच्यातली युती जुलै 2017 ते ऑगस्ट 2022 ही 5 वर्ष टिकली. जनता दल युनायटेड आणि भाजप यांच्यातली युती 1990 च्या दशकात सुरू झाली, तेव्हा जेडीयू मोठ्या भावाच्या रुपात होता.

बिहारमध्ये जेडीयू-भाजप युतीने 2005 साली पहिल्यांदा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. तेव्हापासून नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपपेक्षा जास्त जागा जिंकत असल्यामुळे जेडीयूला मुख्यमंत्रीपद मिळत होतं.

भाजपप्रणीत एनडीएमधून नितीश कुमार 2013 आणि 2017 मध्ये बाहेर पडले, पण त्यांच्या पक्षाला भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्यात यश येत होतं. 2015 साली भाजप आणि जेडीयू एकमेकांविरुद्ध लढले तेव्हा जेडीयूला 71 आणि भाजपला 53 जागांवर यश मिळालं.

मोदी फॅक्टर

बिहारमध्ये भाजपची घोडदौड 2014 लोकसभा निवडणुकीपासून (Loksabha Elections 2014) मोदींच्या (Narendra Modi) करिश्म्यामुळे सुरू झाली. याच कारणामुळे 2013 साली भाजप आणि जेडीयू यांची युती तुटली. लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमधून भाजपला 22 तर जेडीयूला 2 जागा जिंकता आल्या. याशिवाय बिहारमध्ये एनडीएचे घटकपक्ष असलेल्या एलजेपीला 6 आणि राष्ट्रीय लोकसमता पक्षाला 3 अशा एकूण 9 अधिकच्या जागा मिळाल्या.

लोकसभा निवडणुकीनंतर 2015 साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या, पण तिथूनच जेडीयूचा उतरता आलेख सुरू झाला. आरजेडीने (RJD) बिहारमध्ये सर्वाधिक 80 जागा जिंकल्या आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) किंग मेकर झाले.

2017 साली नितीश कुमार यांनी यू टर्न घेत आरजेडीसोबतची युती तोडली आणि पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी केली. भाजपसोबत नितीश कुमार मुख्यमंत्री राहिले आणि 2019 लोकसभा निवडणूक त्यांनी एनडीएमधून लढवली.

2019 लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये 2014 पेक्षा मोठी मोदी लाट आली. यात एनडीएने 40 पैकी 39 जागा जिंकल्या, यात भाजपला सर्वाधिक 17, जेडीयूला 16 आणि एलजेपीला 6 जागा मिळाल्या.

2020 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जेडीयूचा मोठा भाऊ झाल्याचं स्पष्ट झालं. एकेकाळी बिहारमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेला जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. आरजेडी 75 जागांसह बिहारमधली सगळ्यात मोठी पार्टी ठरली, तर भाजपला 74 जागा मिळाल्या. जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली तरीही भाजपने नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला.

नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने विधानसभा अध्यक्षपद आणि दोन उपमुख्यमंत्रीपद आणि महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतली. नितीश कुमार यांना विधानसभा अध्यक्षांना हटवायचं होतं, तसंच त्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांची गरज काय? असा प्रश्नही उपस्थित केला होता.

शिंदे तयार, शिवसेना व्हायची भीती

युतीमध्ये भाजपचा वाढत चाललेला दबदबा आणि शिवसेना (Shivsena) इफेक्टमुळे आगीत तेल ओतायचं काम केलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) बंड केलं, ज्यामुळे सरकार पडलं आणि शिवसेनेतही फूट पडली. एवढच नाही तर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला, याला आता सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्यात आलं आहे.

जेडीयूचे माजी नेते आणि केंद्रातले माजजी स्टील मंत्री आरसीपी सिंग यांचाही एकनाथ शिंदे यांच्यासारखाच वापर करून जेडीयूची अवस्था शिवसेनेसारखी करण्याचा संशय नितीश कुमार यांना आला. भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले. 2020 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने एलजेपीचा वापर करून जेडीयूचं नुकसान केल्याची खात्री नितीश कुमार यांना पटली. भविष्यामध्ये जेडीयूची अवस्थाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसारखी व्हायची भीती लक्षात घेऊन नितीश कुमार यांनी, हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

जेडीयू पक्षातल्याच काही जणांनी आरसीपी सिंग यांना बिहारचा भविष्यातला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायला सुरूवात केली, यामुळेही नितीश कुमार नाराज झाले. अग्नीपथ योजनेला नितीश कुमार यांनी विरोध केला. तसंच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी केली. एनआरसी तसंच धर्मांतर विरोध कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्यालाही नितीश कुमार यांनी विरोध केला. प्रार्थनास्थळांवरचा लाऊड स्पीकर हा मुद्दा नसल्याचंही ते म्हणाले. तेव्हापासूनच नितीश कुमार वेगळी भूमिका घेणार याचे संकेत मिळायला लागले होते.

महाराष्ट्रातलं बंड होऊन दोन महिने होत नाहीत तोच बिहारमध्ये नितीश कुमारांनी पुन्हा एकदा वेगळी चूल मांडली आहे. महाराष्ट्रात घडलेल्या या राजकीय भुकंपाचे हादरे पटण्यामध्ये बसू नयेत, म्हणून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा महागठबंधनचा प्रयोग केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Nitish kumar, Shivsena, Uddhav thackeray