RBI कडे कोट्यवधी रुपये येतात कुठून? जाणून घ्या या 4 गोष्टी

RBI कडे कोट्यवधी रुपये येतात कुठून? जाणून घ्या या 4 गोष्टी

देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सरकारला मदत केली आहे. RBI कडे असलेले 1 लाख 76 हजार कोटी रुपये ही बँक सरकारच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळेच RBI कडे एवढे पैसे कुठून येतात असा प्रश्न विचारला जातोय.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सरकारला मदत केली आहे. RBI कडे असलेले 1 लाख 76 हजार कोटी रुपये ही बँक सरकारच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळेच RBI कडे एवढे पैसे कुठून येतात असा प्रश्न विचारला जातोय. रिझर्व्ह बँकेच्या उत्पन्नाचे काही स्रोत आहेत. नोटा छापण्यासोबतच RBI हेही काम करत असते.

1.RBI बॅलन्स शीट

रिझर्व्ह बँकेचं बॅलन्स शीट बाकीच्या कंपन्यांसारखं नसतं. रिझर्व्ह बँकेच्या मालमत्तेचा 26 टक्के भाग राखून ठेवलेला असतो. हे पैसे परदेशात, भारताच्या बाँड्समध्ये आणि सोन्यामध्ये गुंतवले जातात. RBI कडे सुमारे 600 टन सोनं राखीव आहे.

2. RBI चा इमर्जन्सी फंड

RBI कडे इमर्जन्सी फंड असतो. आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत हे पैसे वापरता येतात.

चिदंबरम आणि इंद्राणी मुखर्जी येणार आमनेसामने,नार्को टेस्टचीही शक्यता

3. RBI चं उत्पन्नाचं साधन काय ?

RBI ला मुख्यत: सरकारी बाँड्स, सोन्यात केलेली गुंतवणूक, जागतिक बाजारातलं बाँड ट्रेडिंग यामधून RBI ला पैसे मिळतात.

4. RBI चा वाढीव निधी म्हणजे काय ?

रिझर्व्ह बँक सरकारच्या खात्यात काही रक्कम जमा करते. 2017-2018 मध्ये RBI च्या खर्चातला बराचसा भाग आणीबाणीच्या फंडातून आला होता. हा खर्च 14 हजार 200 रुपये होता.

===============================================================================================

VIDEO : भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईनमध्ये उभे, दानवेंचा दावा

Published by: Arti Kulkarni
First published: August 27, 2019, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading